सहारा समूहाचे संस्थापक सुब्रताे रॉय यांचे दीर्घ आजाराने निधन
पुढारी ऑनलाईन डेस्क : सहारा समूहाचे संस्थापक सुब्रत रॉय यांचे आज (दि 14 नोव्हेंबर) दीर्घ आजाराने वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले. मंगळवारी मुंबईतील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. (Sahara Group founder Subrata Roy)
सुब्रत रॉय हे सहारा इंडिया परिवाराचे संस्थापक होते. 10 जून 1948 रोजी अररिया, बिहार येथे जन्मलेले रॉय हे प्रसिद्ध भारतीय व्यावसायिक होते. ते वित्तीय, रिअल इस्टेट, मीडिया यासह विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत होते. मुंबईतील कोकिळाबेन धीरूभाई रुग्णालयात आज (दि. १४) रात्री 10:30 वाजताच्या सुमारास त्यांचे निधन झाल्याची माहिती आहे. त्यांचे पार्थिव उद्या (15 नोव्हेंबर) लखनौमधील सहारा शहरात आणले जाईल जिथे त्यांना अंतिम श्रद्धांजली वाहण्यात येईल अशी प्राथमिक माहिती आहे. रॉय यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि भाऊ असा परिवार आहे.
सहाराश्री सुब्रत रॉय जी का निधन, अत्यंत दुःखद।
ईश्वर उनकी आत्मा को शांति दें।
शोकाकुल परिजनों को ये असीम दुःख सहने का संबल प्राप्त हो।
भावभीनी श्रद्धांजलि ! pic.twitter.com/QO6vAjriAv
— Samajwadi Party (@samajwadiparty) November 14, 2023
The post सहारा समूहाचे संस्थापक सुब्रताे रॉय यांचे दीर्घ आजाराने निधन appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : सहारा समूहाचे संस्थापक सुब्रत रॉय यांचे आज (दि 14 नोव्हेंबर) दीर्घ आजाराने वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले. मंगळवारी मुंबईतील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. (Sahara Group founder Subrata Roy) सुब्रत रॉय हे सहारा इंडिया परिवाराचे संस्थापक होते. 10 जून 1948 रोजी अररिया, बिहार येथे जन्मलेले रॉय हे प्रसिद्ध भारतीय व्यावसायिक होते. …
The post सहारा समूहाचे संस्थापक सुब्रताे रॉय यांचे दीर्घ आजाराने निधन appeared first on पुढारी.