कॅन्सरने त्रस्त ज्युनियर मेहमूदना पाहून जितेंद्र यांना अश्रू अनावर
पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेते जितेंद्र हे ज्युनियर मेहमूद यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले. पण, ज्युनिअर मेहमूद यांना पाहताच जितेंद्र यांना अश्रू आवरता आले नाही. त्यांची अवस्था पाहून ते रडू लागले. (Jr Mehmood ) ज्यु. मेहमूद यांनी जितेंद्र आणि सचिन पिळगावकर यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर जितेंद्र यांनी मेहमूद यांच्या घरी जाऊन मेहमूद यांची भेट घेतली. (Jr Mehmood )
संबंधित बातम्या
Sunny Deol : सनी देओल रस्त्यावर चक्क मद्यधुंद अवस्थेत?; रिक्षाचालकाने केली मदत
Priyanka Chopra Deepfake : रश्मिका, आलिया, काजोलनंतर डीपफेकची शिकार ठरली प्रियांका
The Archies Premiere Suhana Khan : ‘द आर्चीज’ चा प्रीमियर; शाहरूखच्या फॅमिलीने लावली हजेरी
दोन महिन्यांच्या आजारपणानंतर ज्युनियर महमूद यांना दोन महिन्यांपूर्वी पोटाच्या कॅन्सरचे निदान झाले. ज्युनियर महमूद यांच्या आतड्यामध्ये ट्यूमर असून त्यांच्या यकृत आणि फुफ्फुसात कॅन्सर पसरल्याचे समजते. चौथ्या स्टेजच्या पोटाच्या कॅन्सरने त्रस्त असलेले ज्युनियर मेहमूद यांनी त्यांचे जिवलग मित्र जितेंद्र आणि बालपणीचे मित्र सचिन पिळगावकर यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. ज्युनियर महमूद यांचे मित्र सलाम काझी यांनी ही माहिती दिली होती.
आपल्या मित्राची अशी अवस्था पाहून जितेंद्र रडले. जितेंद्र यांनी ज्युनियर मेहमूद यांच्या डोक्यावर कुरवाळले पण यावेळी त्यांना आपले अश्रू रोखता आले नाहीत. ज्युनियर मेहमूद सध्या मुंबईत त्यांच्या घरी राहत आहेत. त्यांच्यावर लवकरच शस्त्रक्रिया होणार असल्याचे म्हटलं जात आहे. पण डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्याकडे फक्त ४० दिवस बाकी आहेत.
जॉनी लिव्हरही भेटायला आले
काही दिवसांपूर्वी जॉनी लीव्हर आणि मास्टर राजू (राजू श्रेष्ठ) हेदेखील ज्युनियर महमूद यांना भेटायला आले होते.
बालकलाकार म्हणून सुरुवात
ज्युनियर मेहमूदयांनी ६० च्या दशकात बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यांनी टीव्ही मालिकाही केल्या होत्या. २०१९ पर्यंत त्यांनी अभिनय क्षेत्रात काम केले. तेनाली राममध्ये ते शेवटचे दिसले होते.
The post कॅन्सरने त्रस्त ज्युनियर मेहमूदना पाहून जितेंद्र यांना अश्रू अनावर appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेते जितेंद्र हे ज्युनियर मेहमूद यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले. पण, ज्युनिअर मेहमूद यांना पाहताच जितेंद्र यांना अश्रू आवरता आले नाही. त्यांची अवस्था पाहून ते रडू लागले. (Jr Mehmood ) ज्यु. मेहमूद यांनी जितेंद्र आणि सचिन पिळगावकर यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर जितेंद्र यांनी मेहमूद यांच्या घरी जाऊन मेहमूद …
The post कॅन्सरने त्रस्त ज्युनियर मेहमूदना पाहून जितेंद्र यांना अश्रू अनावर appeared first on पुढारी.