मृणाल ठाकुरसोबतच्या अफेअरवर अखेर बादशाहने सोडले मौन

मृणाल ठाकुरसोबतच्या अफेअरवर अखेर बादशाहने सोडले मौन

पुढारी ऑनलाईन : मृणाल ठाकुरसोबत डेटिंग रुमर्सवर आता रॅपर बादशाहने मौन सोडले आहे. मृणाल आणि बादशाह या दोघांचा शिल्पा शेट्टीच्या दिवाळी पार्टीतून एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. बॉलीवूडमध्ये दिवाळी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. अभिनेत्री शिल्पा शेट्टीने आपल्या घरी दिवाळी पार्टी दिली होती. बी-टाऊनचे तमाम स्टार्स यावेळी उपस्थित राहिले. (Badshah On Mrunal Thakur ) शिल्पा शेट्टीच्या दिवाळी पार्टीमध्ये गायक बादशाह आणि त्याच्यासोबत मृणाल ठाकुरचा एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. व्हिडिओमध्ये रॅपर आणि अभिनेत्री एकमेकांचा हात धरलेला दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि बादशाह-मृणालच्या डेटिंगची चर्चा रंगली. पण, अखेर या चर्चेनंतर बादशाहने मौन सोडले आहे. (Badshah On Mrunal Thakur )
संबंधित बातम्या –

Animal Song : ‘अॅनिमल’ मधील वडील- मुलाच्या सुंदर नात्याचं नवं गाणं भेटीला (VIDEO)
Marathi Movie : ‘एकदा येऊन तर बघा’ या महिन्यात तुमच्या भेटीला
Tiger 3 Box Office Collection : ‘टायगर ३’ दोन दिवसात १०० कोटींच्या क्लबमध्ये सामिल

बादशाहने मृणाल सोबतच्या डेटिंगवर सोडले मौन
रॅपर बादशाहने अखेर मौन सोडले आहे. त्याने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर एक स्टेटमेंट जारी केलं आहे आणि क्लियर केलं की, तो मृणालला डेट करत नाहीये. रॅपरने कुणाचे नाव घेतलेलं नाही. परंतु, अप्रत्यक्षात म्हटलं आहे की, इंटरनेटवर हे सर्व चुकीचं सुरु आहे. बादशाहने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, “डिअर इंटरनेट, तुम्हाला पुन्हा एकदा निराश करण्यासाठी खंत आहे. जसे तुम्ही विचार करत आहात, तसे अजिबात नाही.” याचदरम्यान, मृणालने आतापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
याआधी बादशाहने एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये बादशाहने लिहिलं होतं, “तर समजण्याचा प्रयत्न करा. शिक्का फेकण्यात आला आहे’. बादशाहची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, मृणाल ठाकुर नुकताच रिलीज झालेला चित्रपट पिप्पामध्ये दिसली. हाचित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर १० नोव्हेंबर रोजी रिलीज झाला होता.पिप्पामध्ये मृणाल ठाकुरशिवाय ईशान खट्टर, प्रियांशु पेनयुली, सोनी राजदान यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.
The post मृणाल ठाकुरसोबतच्या अफेअरवर अखेर बादशाहने सोडले मौन appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन : मृणाल ठाकुरसोबत डेटिंग रुमर्सवर आता रॅपर बादशाहने मौन सोडले आहे. मृणाल आणि बादशाह या दोघांचा शिल्पा शेट्टीच्या दिवाळी पार्टीतून एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. बॉलीवूडमध्ये दिवाळी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. अभिनेत्री शिल्पा शेट्टीने आपल्या घरी दिवाळी पार्टी दिली होती. बी-टाऊनचे तमाम स्टार्स यावेळी उपस्थित राहिले. (Badshah On Mrunal …

The post मृणाल ठाकुरसोबतच्या अफेअरवर अखेर बादशाहने सोडले मौन appeared first on पुढारी.

Go to Source