Pune : बिबट्याचा दुचाकीस्वार पती-पत्नीवर हल्ला

ओतूर : पुढारी वृत्तसेवा : सोमवारी (दि. ४) सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास दुचाकीस्वार पती-पत्नी आपल्या घरी जात असताना ऊसाचे शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक उभयतावर झेप घेऊन हल्ला केला. यामध्ये दोघेही किरकोळ जखमी झाल्याची माहिती ओतूर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांनी दिली. ही घटना सोमवारी सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान ओतूर हद्दीतील पाथरटवाडी येथे … The post Pune : बिबट्याचा दुचाकीस्वार पती-पत्नीवर हल्ला appeared first on पुढारी.
#image_title

Pune : बिबट्याचा दुचाकीस्वार पती-पत्नीवर हल्ला

ओतूर : पुढारी वृत्तसेवा : सोमवारी (दि. ४) सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास दुचाकीस्वार पती-पत्नी आपल्या घरी जात असताना ऊसाचे शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक उभयतावर झेप घेऊन हल्ला केला. यामध्ये दोघेही किरकोळ जखमी झाल्याची माहिती ओतूर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांनी दिली. ही घटना सोमवारी सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान ओतूर हद्दीतील पाथरटवाडी येथे घडली.
पती समीर घुले, पत्नी अश्विनी घुले (वय २६) समवेत आपल्या मोटरसायकलवरून ओतूर येथे जात असताना कॅनॉललगत असलेल्या उसात डबा धरून बसलेल्या बिबट्याने हा हल्ला केला. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे, वनपाल सुधाकर गीते, वनरक्षक विश्वनाथ बेले व फुलचंद खंडागळे हे घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थ विशाल घुले, सुधाकर घुले, अमोल गीते, अजय मालकर यांचे मदतीने जखमींना प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्र ओतूर येथे नेऊन उपचार करून पुढील उपचारासाठी जुन्नर येथे पाठविले आहे. दरम्यान ग्रामस्थांच्या मागणीनुसार घटनास्थळ कॅनॉल लगत पिंजरा लावण्यात ची व्यवस्था करण्यात आली आहे.
ओतूर परिसर हा बिबट प्रवण क्षेत्र असल्याने ग्रामस्थांनी आपल्या घरासमोर लाईट लावणे, समूहाने फिरणे सोबत बॅटरी व मोबाईलवर गाणी वाजवणे आपले पशुधन सुरक्षित गोठ्यात ठेवणे, तसेच बाहेरून आलेल्या मजुरांना व ऊसतोड मजूर यांना सुरक्षित निवाऱ्याची तसेच लाईटची व्यवस्था करण्यात यावी असे आवाहन वनविभागाकडुन करण्यात येत आहे.
हे ही वाचा :

Pune News : फुरसुंगीकरांचे हलगीनाद आंदोलन
संजीवन समाधी सोहळा : प्रशासनाची जय्यत तयारी ; असा असेल एकूण कार्यक्रम

The post Pune : बिबट्याचा दुचाकीस्वार पती-पत्नीवर हल्ला appeared first on पुढारी.

ओतूर : पुढारी वृत्तसेवा : सोमवारी (दि. ४) सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास दुचाकीस्वार पती-पत्नी आपल्या घरी जात असताना ऊसाचे शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक उभयतावर झेप घेऊन हल्ला केला. यामध्ये दोघेही किरकोळ जखमी झाल्याची माहिती ओतूर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांनी दिली. ही घटना सोमवारी सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान ओतूर हद्दीतील पाथरटवाडी येथे …

The post Pune : बिबट्याचा दुचाकीस्वार पती-पत्नीवर हल्ला appeared first on पुढारी.

Go to Source