पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेटपटू शिखर धवन ( Shikhar Dhawan) याचा आज ( दि. ५ डिसेंबर ) वाढदिवस. यानिमित्त शिखर धवन याला सोशल मीडियावर चाहत्यांकडून आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) शुभेच्छा मिळाल्या आहेत.
‘बीसीसीआय’ने शिखर ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये शिखरच्या कारकीर्दीवर प्रकाश टाकला आहे. शिखर धवन याने २६९ आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून, त्याच्या नावावर १० हजार ८६७ धावा आहेत. 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या संघात त्याचा समावेश होता. दरम्यान वाढदिवसानिमित्त शिखरला चाहत्यांसह आजी-माजी क्रिकेटपटूनी शुभेच्छा दिल्या.
269 intl. matches 👌
10,867 intl. runs 🙌
2⃣0⃣1⃣3⃣ Champions Trophy winner 🏆
Here’s wishing @SDhawan25 a very Happy Birthday! 🎂👏#TeamIndia pic.twitter.com/rbwUdPQvP9
— BCCI (@BCCI) December 5, 2023
शिखर धवन टीम इंडियातील एक डावखुरा सलामीवीर फलंदाज आहे. शिखर बांगलादेशमध्ये 2004 अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत भारताकडून खेळला आणि एकूण 505 धावा करत स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला होता. त्याने ऑक्टोबर 2010 मध्ये विशाखापट्टणम येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) पदार्पण केले. मार्च 2013 मध्ये मोहाली मैदानावर कसोटी पदार्पणातच त्याने सर्वात जलद शतक झळकावले होते. या सामन्यात त्याने 174 चेंडूत 187 धावा केल्या होत्या.
शिखर धवन इंडियन प्रीमियर लीगमध्ये पंजाब किंग्जकडून खेळतो. तर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दिल्लीकडून खेळतो . 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2017 चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये , धवन सर्वात जास्त धावा करणारा खेळाडू होता. या दोन्ही स्पर्धेत त्याने ‘गोल्डन बॅट’ पटकावली होती. . २०१३ च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये तो मालिकावीर ठरला होता. तसेच २०१५ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत तो भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. आयपीएलच्या इतिहासात सलग दोन शतके झळकावणारा तो पहिला खेळाडू ठरला 2018 च्या आशिया कपमध्येही तो मालिकावीर ठरला होता.
Two most awaited things on 𝐃𝐞𝐜𝐞𝐦𝐛𝐞𝐫 𝟓 😉#GTA6 #HappyBirthdayShikharDhawan #GTA6Trailer pic.twitter.com/goXUfvsXko
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) December 5, 2023
हेही वाचा :
Shikhar Dhawan Divorce with Ayesha Mukherjee | शिखर धवनला घटस्फोट मंजूर, पत्नी आयशाने केलेला मानसिक छळ ठरले कारण
Huma Qureshi and Shikhar Dhawan : शिखर धवन आणि हुमा कुरेशी एकमेकांच्या मिठीत, ‘रोमँटिक’ फोटो व्हायरल
The post ‘गब्बर’ @ 38, चाहत्यांचा शिखर धवनवर शुभेच्छांचा वर्षाव appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेटपटू शिखर धवन ( Shikhar Dhawan) याचा आज ( दि. ५ डिसेंबर ) वाढदिवस. यानिमित्त शिखर धवन याला सोशल मीडियावर चाहत्यांकडून आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) शुभेच्छा मिळाल्या आहेत. ‘बीसीसीआय’ने शिखर ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये शिखरच्या कारकीर्दीवर प्रकाश टाकला आहे. शिखर धवन याने २६९ आंतरराष्ट्रीय सामने खेळले …
The post ‘गब्बर’ @ 38, चाहत्यांचा शिखर धवनवर शुभेच्छांचा वर्षाव appeared first on पुढारी.