नौसेना दलाचे व्हाईस ऍडमिरल दिनेश त्रिपाठींनी घेतले रामेश्वराचे दर्शन
आचरा : पुढारी ऑनलाईन : भारतीय नौसेना दिनानिमित्त मालवण तारकर्ली येथे भारतीय नौसेना दलाचे उच्च अधिकारी दाखल झाले आहेत. रविवारी (दि.३ ) रोजी सकाळी भारतीय नौसेना दलाचे उच्च अधिकारी व्हाईस ऍडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वर मंदिराला भेट देत श्रीदेव रामेश्वर यांचे दर्शन घेतले. रामेश्वराचे प्राचीन मंदिर पाहून व्हाईस ऍडमिरल दिनेश त्रिपाठी भारावून गेले आहेत. यावेळी श्री. देव रामेश्वर संस्थानच्यावतीने ट्रस्टचे अध्यक्ष मिलिंद प्रभू मिराशी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
संबंधित बातम्या
बिद्री निवडणूक ; मुरगुड मध्ये दुपारपर्यंत ५० टक्के मतदान
Assembly Election Results : विकास आणि विश्वास मोदीजींच्या सोबत ; देवेंद्र फडणवीसांचे ट्वीट
आढळराव पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम
यावेळी दिनेश त्रिपाठी यांच्यासोबत कॅप्टन सचिन तिर, कमांडर अभिषेक कारभारी, लेफ्टनन एस. के. सिंग, मंगेश दळवी, तसेच आचरा देवस्थान सचिव अशोक पाडावे, कारकून शंकर देसाई, प्रकाश गुरव, कपिल गुरव, राजू घाडी, तलाठी संतोष जाधव, कोतवाल गिरीश घाडी आदी उपस्थित होते.
The post नौसेना दलाचे व्हाईस ऍडमिरल दिनेश त्रिपाठींनी घेतले रामेश्वराचे दर्शन appeared first on पुढारी.
आचरा : पुढारी ऑनलाईन : भारतीय नौसेना दिनानिमित्त मालवण तारकर्ली येथे भारतीय नौसेना दलाचे उच्च अधिकारी दाखल झाले आहेत. रविवारी (दि.३ ) रोजी सकाळी भारतीय नौसेना दलाचे उच्च अधिकारी व्हाईस ऍडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वर मंदिराला भेट देत श्रीदेव रामेश्वर यांचे दर्शन घेतले. रामेश्वराचे प्राचीन मंदिर पाहून व्हाईस ऍडमिरल दिनेश …
The post नौसेना दलाचे व्हाईस ऍडमिरल दिनेश त्रिपाठींनी घेतले रामेश्वराचे दर्शन appeared first on पुढारी.