मध्य प्रदेशात शिवराज सिंह नाही, तर मुख्यमंत्री कोण होणार?
पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून भाजपला बहुमत मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, दुपारी १२.३० पर्यंत मध्य प्रदेशमध्ये भाजप १६० जागांवर आघाडीवर होते. तर काँग्रेस ६७ आणि बीएसपी २ जागांवर पुढे होते.
भाजपने यावेळी मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित केलेला नाही. तसेच भाजपने ३ केंद्रीय मंत्र्यांसह ७ खासदारांना उमेदवारी दिली आहे. भाजपने राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनाही तिकीट दिले आहे. अशा स्थितीत भाजपच्या मुख्यमंत्र्याबाबत सस्पेंस आहे. शिवराज सिंह चौहान पाचव्यांदा मुख्यमंत्री होणार की त्यांच्या जागी अन्य कुणाला संधी देणार? हे पाहणे औत्सुक्याचे आहे. (Madhya Pradesh Election Result 2023)
मध्य प्रदेशमध्ये एक्झिट पोलनंतरच बैठकांचा टप्पा सुरू झाला आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी ग्वाल्हेरमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली होती. आज निकालाचा कल स्पष्ट झाल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे यांनी थेट मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान गाठले आणि शिवराज सिंह चौहान यांची भेट घेतली. त्याचबरोबर वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठीही सुरू झाल्या आहेत. (Madhya Pradesh Election Result 2023)
सबंधित बातम्या :
मध्य प्रदेशात भाजपची निर्णायक आघाडी
भाजपनं छत्तीसगड, राजस्थान काँग्रेसकडून हिसकावलं, ‘एमपी’त पुन्हा ‘कमळ’
राजस्थानात सत्ता बदलाची परंपरा कायम; BJP सत्ता स्थापनेच्या वाटेवर
शिवराज सिंह चौहान प्रबळ दावेदार
भारतीय जनता पक्षाची मध्य प्रदेशात मोठ्या विजयाकडे वाटचाल सुरू आहे. आता मध्य प्रदेशचा मुख्यमंत्री कोण होणार हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवराज सिंह चौहान यांनी या निवडणुकांमधील मेहनत आणि त्यांच्या महिला कल्याणकारी धोरणांची लोकप्रियता पाहिली असता पक्ष त्यांना बाजूला कसे करणार? हा सवाल आहे. कर्नाटकात बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनवून हात भाजणाऱ्या भाजपने मध्य प्रदेशात सत्ताविरोधी भावना दूर व्हावी म्हणून शिवराज यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनवले नाही. पण इथे उलटे झाले. जनता शिवराज चौहान यांच्या योजनांनी एवढी प्रभावित झाली की त्यांनी भाजपला भरभरून मतदान केले.
पण ज्या पक्षाने मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनवला नाही, तो पक्ष पाचव्यांदा मुख्यमंत्रीपदासाठी शिवराज सिंह यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवणार का? शिवराज नाही तर अन्य दावेदार कोण? हा प्रश्न कायम आहे. शिवराज चौहान मुख्यमंत्री झाले नाहीत तर ज्योतिरादित्य शिंदे, नरेंद्र सिंह, कैलाश विजयवर्गीय, व्हीडी शर्मा आदींची नावे घेतली जात आहेत.
प्रल्हादसिंग पटेल
केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा आहे. शिवराज यांच्यानंतर राज्यातील भाजपच्या ओबीसी प्रवर्गातील सर्वात मोठ्या चेहऱ्यांमध्ये प्रल्हाद पटेल यांचे नाव आघाडीवर आहे. मध्य प्रदेशात ओबीसी लोकसंख्या ५० टक्क्यांहून अधिक आहे. भाजपने चेहरा बदलल्यास त्यांचा दावा बळकट होईल.
फग्गनसिंग कुलस्ते
यानंतर भाजपमधील सर्वात मोठे आदिवासी नेते फग्गनसिंग कुलस्ते यांचेही नाव चर्चेत आहे. ते मांडला जिल्ह्यातील निवास विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. कुलस्ते आणि भाजपच्या बाजूने निकाल लागल्याने प्रयोग म्हणून पक्ष आदिवासी चेहऱ्याला संधी देऊ शकतो.
नरेंद्रसिंह तोमर
मुरैना जिल्ह्यातील दिमानी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर हेही मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. निवडणुकीच्या सुरुवातीला ते फ्रंटफूटवर होते. निवडणुकीची मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती. त्यांच्या मुलाच्या कथित व्यवहाराचा व्हिडिओ समोर आल्यानंतर मात्र त्यांनी काहीशी माघार घेतली.
व्हीडी शर्मा
यासोबतच भाजपचे प्रदेशाध्यक्ष व्हीडी शर्मा यांच्या नावाचीही चर्चा आहे. निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदींनी त्यांचे कौतुक केल्याने या शक्यतांना बळ मिळाले. निवडणूक रॅलीदरम्यान पंतप्रधान मोदींनी स्टेजवर त्यांच्या पाठीवर थाप मारली होती. तसेच व्हीडी शर्मा इंदूरच्या रॅलीत पीएम मोदींसोबत रोड शोमध्ये एकटेच होते. प्रदेशाध्यक्षपदाचाही कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना दुसरी संधी मिळाली.
कैलास विजयवर्गीय
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांचाही दावा आहे. विजयवर्गीय यांनी पश्चिम बंगालमध्ये पक्ष मजबूत केला आहे. केंद्रीय नेतृत्वाशी असलेली त्यांची जवळीक त्यांना राज्याचे प्रमुख बनवू शकते.
हेही वाचा :
तेलंगणामधील जनतेने ‘केसीआर’ यांना का नाकारले? जाणून घ्या मुख्य कारणे
पाच राज्यांमधील निवडणूक निकालांवरील आनंद महिंद्रांचं ट्वीट चर्चेत!
तेलंगणात KCR ला धक्का, काँग्रेसने पार केला बहुमताचा आकडा
The post मध्य प्रदेशात शिवराज सिंह नाही, तर मुख्यमंत्री कोण होणार? appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून भाजपला बहुमत मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, दुपारी १२.३० पर्यंत मध्य प्रदेशमध्ये भाजप १६० जागांवर आघाडीवर होते. तर काँग्रेस ६७ आणि बीएसपी २ जागांवर पुढे होते. भाजपने यावेळी मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित केलेला नाही. तसेच भाजपने ३ केंद्रीय मंत्र्यांसह ७ खासदारांना उमेदवारी दिली …
The post मध्य प्रदेशात शिवराज सिंह नाही, तर मुख्यमंत्री कोण होणार? appeared first on पुढारी.