महाराष्ट्रात प्रथमच नंदुरबारला सिकलसेल तपासणी यंत्र झाले प्राप्त
नंदुरबार – सिकलसेल ऍनिमिया हा घातक आजार होण्याआधीच प्रतिबंधात्मक उपाय करता यावे यासाठी आवश्यक असलेले अत्यंत आधुनिक तपासणी यंत्र नंदुरबार येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल झाले असून हे आधुनिक यंत्र प्राप्त झालेला नंदुरबार हा महाराष्ट्रातील पहिला आणि एकमेव आदिवासी जिल्हा ठरला आहे. आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित आणि संसद रत्न खासदार डॉक्टर हिना गावित यांनी विशेष प्रयत्न करून ही व्यवस्था नंदुरबार जिल्ह्याला प्राप्त करून दिली आहे.
नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील लॅब मध्ये हे यंत्र कार्यान्वित करण्यात आले आहे. संसद रत्न खासदार डॉक्टर हिना गावित, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित, जिल्हा परिषदेच्या सभापती संगीता गावित यांनी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात भेट देऊन या तपासणी यंत्राची पाहणी केली. जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी त्या प्रसंगी सर्व माहिती दिली. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेश वसावे, नंदुरबार जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर हुमणे आणि संबंधित सर्व वरिष्ठ अधिकारी या प्रसंगी उपस्थित होते. येत्या तीन महिन्यात दोन लाख विद्यार्थ्यांची तपासणी केली जाईल आणि जिओ टॅगिंग द्वारे त्यांची सर्व माहिती संग्रहित ठेवली जाईल. दर तासाला 45 रुग्णांची तपासणी करण्याची या यंत्राची क्षमता आहे; अशी माहिती या प्रसंगी देण्यात आली.
नंदुरबार जिल्ह्यात कुपोषण, बालमृत्यू याच्याबरोबरच सिकलसेल ऍनिमिया या अनुवंशिक आजाराचा देखील अनेक वर्षांपासून गंभीर प्रश्न आहे. विशेषतः आदिवासींमध्ये हा आजार आढळून येतो. हा एक रक्तदोषाशी संबंधित आजार असून सारख्या रक्तगटातील स्त्री-पुरुषांच्या वैवाहिक संबंधातून निर्माण होतो. व्यक्तीमध्ये सामान्यतः लाल रक्तपेशी वाटोळ्या आकाराच्या असतात. सिकलसेल झालेल्या व्यक्तीच्या लाल रक्तपेशी विळ्याच्या आकाराच्या असतात. नंदुरबार जिल्ह्यात असे रुग्ण हजारोच्या संख्येने असल्याचे मागील पंधरा वर्षात झालेल्या अनेक तपासणीतून निष्पन्न झाले. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी विशेष कृती कार्यक्रम राबवून झाले जनजागृती देखील करण्यात आली तेव्हापासून काही अंशी नियंत्रण यायला सुरुवात झाली आहे. दरम्यान आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित आणि संसद रत्न खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांनी प्रयत्न करून सिकलसेल आजाराला नियंत्रित करणाऱ्या उपाययोजनांना चालना दिली. नंदुरबार जिल्हा रुग्णालयाला जवळपास दोन कोटी रुपये खर्चाची प्राप्त झालेली आधुनिक तपासणी यंत्रे त्याचाच एक भाग आहे.
The post महाराष्ट्रात प्रथमच नंदुरबारला सिकलसेल तपासणी यंत्र झाले प्राप्त appeared first on पुढारी.
नंदुरबार – सिकलसेल ऍनिमिया हा घातक आजार होण्याआधीच प्रतिबंधात्मक उपाय करता यावे यासाठी आवश्यक असलेले अत्यंत आधुनिक तपासणी यंत्र नंदुरबार येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल झाले असून हे आधुनिक यंत्र प्राप्त झालेला नंदुरबार हा महाराष्ट्रातील पहिला आणि एकमेव आदिवासी जिल्हा ठरला आहे. आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित आणि संसद रत्न खासदार डॉक्टर हिना …
The post महाराष्ट्रात प्रथमच नंदुरबारला सिकलसेल तपासणी यंत्र झाले प्राप्त appeared first on पुढारी.