महिन्याला ७ लाख पगार; कसा खर्च करावा? पोस्ट चर्चेत

बंगळूर : एकीकडे अनेकांना दोन वेळेच्या जेवणाचीही भ्रांत असताना, दुसरीकडे अनेकांना पैसा कसा खर्च करावा, याची काळजी लागते! बंगळूरमधील एक दाम्पत्य दर महिन्याला सात लाख रुपये कमावते. ऐशोरामात राहूनही बराच पैसा शिल्लक पडतो, त्यामुळे तो कसा खर्च करावा? अशी पोस्ट त्यांनी सोशल मीडियात केली आहे! हे दोघे पती-पत्नी बंगळूरमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करतात. त्यांनी …

महिन्याला ७ लाख पगार; कसा खर्च करावा? पोस्ट चर्चेत

बंगळूर : एकीकडे अनेकांना दोन वेळेच्या जेवणाचीही भ्रांत असताना, दुसरीकडे अनेकांना पैसा कसा खर्च करावा, याची काळजी लागते! बंगळूरमधील एक दाम्पत्य दर महिन्याला सात लाख रुपये कमावते. ऐशोरामात राहूनही बराच पैसा शिल्लक पडतो, त्यामुळे तो कसा खर्च करावा? अशी पोस्ट त्यांनी सोशल मीडियात केली आहे!
हे दोघे पती-पत्नी बंगळूरमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करतात. त्यांनी लिहिले आहे की, आम्हाला अपत्य नाही. मासिक कमाई सात लाख रुपये आणि त्यामध्ये वार्षिक बोनसही समाविष्ट आहे. त्यामधील दोन लाख रुपये म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतो. सर्व मिळून दर महिन्याचा खर्च दीड लाख रुपये आहे.
बंगळूरमध्ये एका चांगल्या सोसायटीमध्ये राहतो. कार आहे, खर्च करण्याआधी विचार करीत नाही. इतकं असूनही बँक खात्यात तीन लाख शिल्लक राहतात. हे पैसे कसे खर्च करायचे हे माहिती नाही. आम्ही दोघेही फारसे शौकीन नाही, जिथे आम्ही पैसे खर्च करू. त्यामुळे आम्हाला अधिक कमावण्याची लालसाही नाही. यावर उपाय सांगा, असे त्यांनी लोकांना विचारले आहे. ‘एक्स’वर याचा स्क्रीनशॉट शेअर करण्यात आला आहे. त्यावर अनेकांचे भन्नाट रिप्लायही येत आहेत!