पाकिस्‍तानला ‘धूळ’ चारणार्‍या नेत्रावळकरला ‘टीम इंडिया’ची प्रतीक्षा

पुढारी ऑनलाईन डेस्क | Saurabh Netravalkar : क्रिकेट संघ तोही अमेरिकेचा म्‍हणजे पराभव निश्‍चितच, असेच काहीसे क्रिकेटप्रेमींचे भाकित होते;पण क्रिकेट इज गेम ऑफ चान्‍स हे वाक्‍य हा संघ अक्षरक्ष: जगला आणि चक्‍क पाकिस्‍तानसारख्‍या अनुभवी संघाचा सुफडासाफ केला. या विजयाचा शिल्‍पकार हाेता सौरभ नेत्रावळकर. त्‍याने सुपर ओव्‍हरमध्‍ये केलेल्‍या भेदक मार्‍यासमाेर पाकिस्‍तानच्‍या फलंदाजांनी लाेटांगण घातलं. आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमध्‍ये …
पाकिस्‍तानला ‘धूळ’ चारणार्‍या नेत्रावळकरला ‘टीम इंडिया’ची प्रतीक्षा

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क | Saurabh Netravalkar : क्रिकेट संघ तोही अमेरिकेचा म्‍हणजे पराभव निश्‍चितच, असेच काहीसे क्रिकेटप्रेमींचे भाकित होते;पण क्रिकेट इज गेम ऑफ चान्‍स हे वाक्‍य हा संघ अक्षरक्ष: जगला आणि चक्‍क पाकिस्‍तानसारख्‍या अनुभवी संघाचा सुफडासाफ केला. या विजयाचा शिल्‍पकार हाेता सौरभ नेत्रावळकर. त्‍याने सुपर ओव्‍हरमध्‍ये केलेल्‍या भेदक मार्‍यासमाेर पाकिस्‍तानच्‍या फलंदाजांनी लाेटांगण घातलं. आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमध्‍ये अमेरिकेने ऐतिहासिक विजय नाेंदवला.  सौरभ नेत्रावळकरच्‍या कामगिरीचे क्रिकेटप्रेमींकडून काैतूक हाेत आहे. आता त्याने टीम इंडियाबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
सौरभ भारताच्या अंडर-19 संघाचा सदस्य
मुंबईत जन्मलेला नेत्रावळकर हा भारतीय युवा संघाचा खेळाडू होता. तो मयांक अग्रवाल, केएल राहुल आणि अनेक खेळाडूंसोबत भारताच्या अंडर-19 संघाकडून खेळला.  त्यावेळी भारतीय संघ अंडर-19 विश्वचषकात प्लेऑफ फेरीतून बाहेर पडला होता. 2010 च्या अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत सौरभने सहा सामन्यांत नऊ विकेट्स घेतल्या होत्या. 25 धावांत तीन बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. काही कारणांमुळे तो अमेरिकेत गेला.  तो आता आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमध्‍ये अमेरिकेचे प्रतिनिधित्व करत आहे.
‘तो क्षण खूप भावनिक असेल’
भारतीय क्रिकेट संघाबाबत बाेलताना सौरभ म्‍हणाला, माजी सहकाऱ्यांना भेटण्याचा क्षण माझ्यासाठी खास असेल. प्रत्येकासाठी ही खूप खास भावना आहे. आम्ही स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतली आहे. खरे सांगायचे तर, आम्ही पाकिस्‍तानविरुद्‍धचा सामना जिंकू असे आम्हाला वाटले नव्हते. आम्ही फक्त आमचे सर्वोत्तम देण्याचा विचार केला होता, असेही त्‍याने स्‍पष्‍ट केले.
सौरभ नेत्रावळकरची क्रिकेट कारकीर्द
सौरभने आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये अमेरिकेसाठी 48 एकदिवसीय आणि 29 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने वन-डे क्रिकेटमध्ये 78 आणि टी-20मध्ये 29 बळी घेतले आहेत. वन-डेमध्ये 32 धावांत 5 विकेट अशी सर्वोत्तम कामगिरी आहे. टी-20मध्ये 12 धावांत 5 विकेट ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी आहे. त्याच्या नावावर एक प्रथम श्रेणी सामना आहे, ज्यामध्ये त्याने तीन विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्याने 80 श्रेणी-अ सामन्यांमध्ये 117 विकेट्स घेतल्या आहेत. एकूण लीग आणि आंतरराष्ट्रीय T20 यासह त्याच्या नावावर 29 सामने आहेत, ज्यात त्याने 29 विकेट घेतल्या आहेत.

WHAT. A. FINISH!!!! 🤩🤩#TeamUSA wins their second match of the @ICC @T20WorldCup against Pakistan by 5 runs! 🔥#T20WorldCup | #USAvPK | #WeAreUSACricket 🇺🇸 pic.twitter.com/hYuDW0zvTj
— USA Cricket (@usacricket) June 6, 2024