सोनुर्ली येथे भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : कोरपना गडचांदूर राष्ट्रीय महामार्गावर सोनुर्ली गावाजवळ एक भीषण अपघात बुधवारी (दि.5) घडला. या अपघातात कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकने दुचाकीस्वारांना उडवल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला. समीर मडावी आणि प्रियंका झित्रु कुडसंगे (वय 20) असे मृत्तांची नावे असून दोघेही खडकी गावातील रहिवासी होते. पोलिस दिलेल्या माहितीनुसार, कोरपना …

सोनुर्ली येथे भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

चंद्रपूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : कोरपना गडचांदूर राष्ट्रीय महामार्गावर सोनुर्ली गावाजवळ एक भीषण अपघात बुधवारी (दि.5) घडला. या अपघातात कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकने दुचाकीस्वारांना उडवल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला. समीर मडावी आणि प्रियंका झित्रु कुडसंगे (वय 20) असे मृत्तांची नावे असून दोघेही खडकी गावातील रहिवासी होते.
पोलिस दिलेल्या माहितीनुसार, कोरपना गडचांदुर राष्ट्रीय महामार्गाचे मागील वर्षभरापासून काम सुरू आहे. या काळात महामार्गावर आतापर्यंत अनेकांना जीव गमवावा लागला आहे. तर अपघातात अनेक लोक जखमीसुद्धा झाले आहेत.
सोनुर्ली येथील महामार्गावरुन ट्रक कोरपनामार्गे गडचांदूरकडे जात होता. तर समीर मडावी आणि प्रियंका कुडसंगे हे दुचाकीवरुन विरुद्ध दिशेने येत होते. यामध्ये ट्रक आणि माडवी यांच्या वाहणाची समोरा-समोर धडक झाली. या धडकेत ट्रकच्या पुढच्या भागात दुचाकी फसली. तर जोरात दिलेल्या धडकीने समीर आणि प्रियंका लांब उडून पडले. त्यामूळे डोक्याला जबर मार लागल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती कोरपना पोलिसांना मिळताच, त्यांनी घटणस्थळी पोहचून पंचनामा करुन मृत्तदेह ताब्यात घेतले. तसेच पोलिसांनी ट्रक चालक विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे खडकी गावात शोककळा पसरली आहे.
हेही वाचा :

सोलापूर : बोरामणीजवळ कार-कंटेनर अपघातात बाप-लेक ठार ; दोघे जखमी
परभणी: हादगाव येथे दुचाकी-कारची धडक; एक ठार, अपघातग्रस्त कार पेटवली
हुश्श्..! करंजी घाटात ट्रकचा अपघात टळला