सोलापूर : टपाली मतदानात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आघाडीवर
सोलापूर: Bharat Live News Media वृत्तसेवा सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी आज (मंगळवार) सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरुवात झाली. दरम्यान सकाळी सात वाजून 58 मिनिटांनी स्ट्रॉंग रूम उघडण्यात आल्या. मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून टपाली मतदानाने मतमोजणीस प्रारंभ झाला.
टपाली मतदानात सोलापुरात काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे आघाडीवर तर माढ्यात धैर्यशील मोहिते पाटील आघाडीवर आहेत. प्रत्येक अर्ध्या तासाला एक फेरी पूर्ण होणार आहे. सकाळी नऊ वाजता ईव्हीएम मतमोजणीस सुरुवात होणार आहे.
हेही वाचा :
Madha Lok Sabha Result 2024 : रणजितसिंह की धैर्यशील? आज फैसला
Lok Sabha Result : राज्याचा पहिला कल दुपारी 12 वाजता
Lok Sabha Election Result LIVE : प्रारंभीच्या मतमाेजणीत ‘एनडीए’ आघाडीवर