बेळगाव: सांबरा येथे अग्निवीर वायुसैनिकांनी घेतली देशसेवेची शपथ
बेळगाव: Bharat Live News Media वृत्तसेवा : देशसेवेत दाखल होण्यापूर्वी 22 आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण तुम्ही घेतले आहे. तुमचे आई-वडील पालक, नातेवाईक आणि मित्रमंडळी तुमच्या भूमिकेकडे लक्ष ठेवून आहेत. सर्व प्रशिक्षणार्थींना त्यांच्या संबंधित कामाच्या वातावरणात त्यांच्या वरिष्ठांकडून मार्गदर्शन करण्यात आले आहे. विविध व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करण्यासाठी तुम्ही परिश्रम घेतले आहेत. देशसेवा करताना समर्पण आणि निष्ठा कायम ठेवण्याचे आवाहन एअर व्हाईस मार्शल आर. रविशंकर यांनी अग्निवीरांना केले.
सांबरा येथील हवाई प्रशिक्षण केंद्रात दीक्षांत समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
युवकांबरोबर हवाई दलात 60 युवतीने देखील प्रशिक्षण घेतले आहे. अग्निवीर वायू प्रशिक्षणार्थींच्या तिसरी तुकडी सांबरा येथील हवाई दल प्रशिक्षण केंद्रातून बाहेर पडत आहे. या दीक्षांत समारंभाचे औचित्य साधून सैनिकांनी चित्त थरारक कसरती करून दाखवल्या.
प्रशिक्षण घेताना उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल विवेक सिंग रावत, नितेश यांना गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला अग्नीवीर वायुसैनिकांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा
बेळगाव: गणेबैल टोल नाक्यावर काँग्रेसचा रास्ता रोको
बेळगाव : उचगावच्या मळेकरणी देवस्थानमध्ये बकऱ्यांचा बळी देण्यास बंदी
बेळगाव: सांबरा मैदानात नेपाळच्या देवा थापाच्या कुस्तीची रंगत