अकरावीसाठी ५ जूनपासून ऑप्शन फॉर्म

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– सन २०२४-२५साठी इयत्ता अकरावी प्रवेशप्रक्रियेच्या पूर्वतयारीला शुक्रवारी (दि. २४) प्रारंभ झाला. त्यासाठी शुक्रवार (दि. ३१) पर्यंत ९ हजार१४८ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरलेत. त्यातील दोन हजार ९२५ विद्यार्थ्यांच्या अर्जांंचे प्रमाणीकरण झाले आहे. दि. ५ जूनपासून प्रवेशाची दुसरी फेरी सुरू होणार आहे. एक हजार ५४७ अर्ज ऑटो व्हेरिफाईड झाले आहेत. विद्यार्थ्यांना http://11thadmission.org.in या संकेतस्थळावर …

अकरावीसाठी ५ जूनपासून ऑप्शन फॉर्म

नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा– सन २०२४-२५साठी इयत्ता अकरावी प्रवेशप्रक्रियेच्या पूर्वतयारीला शुक्रवारी (दि. २४) प्रारंभ झाला. त्यासाठी शुक्रवार (दि. ३१) पर्यंत ९ हजार१४८ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरलेत. त्यातील दोन हजार ९२५ विद्यार्थ्यांच्या अर्जांंचे प्रमाणीकरण झाले आहे. दि. ५ जूनपासून प्रवेशाची दुसरी फेरी सुरू होणार आहे. एक हजार ५४७ अर्ज ऑटो व्हेरिफाईड झाले आहेत.
विद्यार्थ्यांना http://11thadmission.org.in या संकेतस्थळावर अर्ज नोंदणीसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नाशिक मनपा हद्दीत ६५ हून अधिक कनिष्ठ महाविद्यालयांत २६ हजार ४८० इतक्या जागांसाठी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबवली जाणार आहे. शिक्षण विभागाची अकरावी प्रवेशप्रक्रियेसाठी पूर्वतयारी झाली असून, त्यासाठी विद्यार्थी-पालकांना प्रवेशप्रक्रियेसाठी पूर्ण मार्गदर्शनही करण्यात येत आहे.
कनिष्ठ महाविद्यालयांनी भरलेली माहिती इयत्ता दहावीचा निकाल जाहीर होण्याच्या तारखेपर्यंत शिक्षण उपसंचालक कार्यालयातून ऑनलाइन प्रमाणित करणे बंधनकारक राहणार आहे. दरम्यान, शुक्रवार (दि. ३०) पासून फॉर्म-१ भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली असून, ५ जूनपासून दुसऱ्या अर्जासाठी प्रारंभ होणार आहे.
शाखानिहाय उपलब्ध जागा

विज्ञान- ७ हजार ८००
वाणिज्य-५ हजार ८१०
कला -३ हजार ७५०
एमसीव्हीसी- ८२०
एकूण- २६ हजार ४८०

तीन नियमित, एक विशेष फेरी
अकरावी प्रवेशासाठी यंदा प्राधान्य फेरी काढून टाकण्यात आली आहे. यावेळी तीन नियमित, तर दोन विशेष फेऱ्या होणार आहेत. त्यानंतर रिक्त जागांसाठी विशेष आणि दैनिक गुणवत्ता फेऱ्या पार पडतील. पहिल्या विशेष फेरीनंतर अकरावीचे वर्ग सुरू करण्याचे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे. दरम्यान, विविध कोटाअंतर्गत प्रवेशप्रक्रिया विविध फेऱ्यांबरोबरच समांतरपणे सुरू राहणार आहे.
हेही वाचा –

कोल्हापूरशी आर माधवनचे ऋणानुबंध; आवडत्या मिसळीचा कट अन्‌ बरंच काही…
Water Supply Scheme | चांदवडची २४ तास पाणी पुरवठा योजना कागदावरच, शहरवासीयांना पाच ते सहा दिवसांनी पुरवठा