पालिकेसमोरच मांडल्या चुली अन् थापल्या भाकरी; पाण्यासाठी महिलांचे आंदोलन

पालिकेसमोरच मांडल्या चुली अन् थापल्या भाकरी; पाण्यासाठी महिलांचे आंदोलन

शेवगाव तालुका : Bharat Live News Media वृत्तसेवा : पाणी व इतर मागण्या मान्य होईपर्यंत हटणार नाही अशा निर्धाराने आंदोलकांचा दगडाच्या चुली, त्यावर भाजी-भाकरीचा स्वयंपाक सुरू झाला. पाण्याचे टँकर, विद्युत जनित्र, रुग्णवाहिका, शेकडो महिला आणि नागरिकांची आंदोलनात झालेली गर्दी पाहता प्रशासनाला घाम फुटला. शहर पाणीपुरवठा योजनेसह नियमित पाणीपुरवठा, रस्ते, सांडपाणी व विद्युतीकरणाच्या मागणीसाठी शहर कृती समितीतर्फे जनशक्ती मंचचे अध्यक्ष अ‍ॅड. शिवाजी काकडे, माजी जि. प. सदस्या हर्षदा काकडे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिलांसह नागरिकांनी गुरुवारी (दि. 30) नगरपरिषद कार्यालयासमोर मुक्काम ठोको आंदोलन केले. या आंदोलनात वकील, डॉक्टर, व्यापारी, शेतकरी, मजूर आदी सहकुटुंंब सहभागी झाले होते.
मुख्याधिकारी संतोष लांडगे व तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी सर्व मागण्यांची पूर्तता करण्याचे लेखी आश्वासन दिल्याचे कृती समितीप्रमुख हर्षदा काकडे यांनी जाहीर केल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. नवीन योजनेचा दि. 31 जुलैपर्यंत कार्यारंभ आदेश देऊ. सहा ते सात दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा करु, सांडपाणी व्यवस्थापन डी.पी.आर. तयार केला असून, तांत्रिक मान्यतेसाठी पाठवला आहे. वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत रस्ता गटारीकरीता 2 कोटी 97 लाख, अंतर्गत रस्ते, 4 कोटी 40 लाख, अंतर्गत रस्ते, भुयारी गटार व विद्युतीकरणासह 34 कामांसाठी 9 कोटी 81 लाख, अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत 98 लाख 40 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्याची कामे आचारसंहिता संपल्यानंतर सुरू होतील, असे आश्वासन देण्यात आले.
हेही वाचा

कोल्हापूर : मोटारीचा ताबा सुटल्याने घुणकीजवळ अपघात; एकजण ठार
गृहप्रकल्पांच्या जाहिरातीवर मेट्रोचे छायाचित्र
नवनाथ महाराज काळे यांना अखेरचा निरोप