दिव्यांगांना एसटीत जागा मिळेना

मंचर : पुढारी वृत्तसेवा : ज्येष्ठ व महिलांना प्रवास भाड्यात मोठी सवलत दिल्याने एसटी स्थानकावर मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे बसमध्ये जागाच मिळत नसल्याची खंत दिव्यांग बांधवांनी व्यक्त केली. राज्य परिवहन महामंडळाच्या प्रत्येक बसमध्ये विशेष घटकांतील नागरिकांसाठी काही जागा आरक्षित असतात. परंतु, त्याचा लाभ होत नसल्याने दिव्यांगांना अनेक गैरसीयींचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण भागात …

दिव्यांगांना एसटीत जागा मिळेना

मंचर : Bharat Live News Media वृत्तसेवा : ज्येष्ठ व महिलांना प्रवास भाड्यात मोठी सवलत दिल्याने एसटी स्थानकावर मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे बसमध्ये जागाच मिळत नसल्याची खंत दिव्यांग बांधवांनी व्यक्त केली. राज्य परिवहन महामंडळाच्या प्रत्येक बसमध्ये विशेष घटकांतील नागरिकांसाठी काही जागा आरक्षित असतात. परंतु, त्याचा लाभ होत नसल्याने दिव्यांगांना अनेक गैरसीयींचा सामना करावा लागत आहे.
ग्रामीण भागात प्रवासासाठी एसटी बसलाच प्राधान्य दिले जाते. त्यातच एसटी महामंडळाने महिलांना प्रवासात 50 टक्के सवलत दिली आहे. त्यामुळे एसटी प्रवासात महिलांची गर्दी वाढली आहे. बसमध्ये नेहमीच महिला मोठ्या संख्येने दिसत आहेत. ज्येष्ठांनाही सवलत दिल्याने त्यांचीही गर्दी वाढली आहे.
आरक्षित जागा नावालाच
दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या जागांवर अन्य प्रवासी बसत आहेत. यामुळे दिव्यांगांना जागाच मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. बसमध्ये विशेष घटकांतील नागरिकांसाठी काही सीट राखीव असल्या तरी त्याचा वापर इतर प्रवासी करीत असल्याने राखीव जागा फक्त नावालाच उरल्या आहेत.
गर्दीमुळे दिव्यांगांची गैरसोय
प्रवाशांच्या गर्दीमुळे बसमध्ये जागा पकडण्यासाठी एकच झुंबड उडते. त्यामुळे दिव्यांगांना जागा पकडणे शक्य होत नाही. त्यांना आरक्षित जागेचा फायदा होत नाही. त्यांना ताटकळत उभे राहूनच तर कधी खाली बसून प्रवास करावा लागत आहे. दिव्यांग प्रवाशांना बसमध्ये चढण्यास व उतरण्यास चालक व वाहकांनी मदत करावी, अशा सूचना आहेत. मात्र, चालक व वाहक आपल्या कामात व्यस्त असतात. त्यामुळे दिव्यांग प्रवाशांना बसमध्ये प्रवास करताना अडचणी येत आहेत. याकडे आगारप्रमुखांनी लक्ष देण्यासह चालक व वाहकांनीही स्वतःहून दिव्यांगांना मदत करणे गरजेचे आहे, असे समीर टावरे यांनी सांगितले.
सवलत जाहीर होण्यापूर्वी एसटी बसमध्ये एवढी गर्दी नसायची. त्यामुळे जागा मिळायची, परंतु आता सर्व मार्गावरील एसटी बसेस नेहमी फुल्ल राहतात. त्यामुळे एसटीत चढण्याचीच मोठी अडचण होते. जागा न मिळाल्यास खाली बसून प्रवास करावा लागतो. त्यामुळे दिव्यांगांची गैरसोय होत आहे, याकडे एसटीच्या अधिकार्‍यांनी लक्ष द्यावे.
– सुनील दरेकर, ज्ञानेश्वर शिंदे, दिव्याग बांधव

हेही वाचा 

दापसरे-कुर्तवडीला माडासह वनौषधींचे वरदान; शिवकालीन ठेवा जतन
यंदा पालखी प्रस्थान सोहळ्यात गर्दीवर अंकुश; काय आहे नियोजन?
Maharashtra Legislative Council Election : आजपासून शिक्षक निवडणुकीची रणधुमाळी