शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता ! अखेर मान्सून केरळमध्ये दाखल
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: दोन दिवस आधीच म्हणजे आज गुरुवार ३० मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. उत्तर पूर्व भारत आणि केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाले आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.
हवामान विभागाने म्हटले आहे की, नैऋत्य मोसमी पावसाने आज ३० मे 2024 रोजी केरळ आणि ईशान्य भारताच्या बहुतांश भागांमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान आज कोकणात हलक्या सरी कोसळण्याची शक्यता देखील विभागाने वर्तवली आहे.
दरवर्षी १ जून रोजी केरळात दाखल होणारा मान्सून यंदा ३१ मे रोजी केरळमध्ये दाखल होईल अशी शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली होती. परंतु यापूर्वीच म्हणजे दरवर्षीपेक्षा यंदा दोन दिवस आधीच मान्सून केरळात दाखल झाला असल्याचे हवामान विभागाने X पोस्ट करत सांगितले आहे.
Southwest Monsoon has set in over Kerala and advanced into most parts of Northeast India today, the 30th May, 2024.@moesgoi @KirenRijiju @Ravi_MoES @ndmaindia @WMO @DDNational @airnewsalerts @PMOIndia
— India Meteorological Department (@Indiametdept) May 30, 2024
मान्सून आगमनाच्या पार्श्वभूमीव केरळमधील कोट्टायम जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली असल्याचे वृत्त देखील एएनआयने दिले आहे.
#WATCH | Kerala: Rain lashes several parts of Kottayam district
As per IMD, Southwest Monsoon has set in over Kerala and advanced into most parts of Northeast India today, 30th May. pic.twitter.com/0ersoKXonI
— ANI (@ANI) May 30, 2024
हे ही वाचा:
Southwest Monsoon | जुलैपर्यंत ‘ला निना’! ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये अधिक पाऊस, IMD ची माहिती
Monsoon Update: यंदा भारतातील ‘या’ भागात मान्सून दमदार बरसणार; IMD
Monsoon Report : यंदा मोसमी पाऊस वेळेआधी; हवामानशास्त्रज्ञांचा मान्सूनबाबत आशादायी अंदाज