नांदगावी एसटी बस- अल्टो अपघातात माय लेकासह लेकीचा मृत्यू
नांदगाव (जि. नाशिक) : Bharat Live News Media वृत्तसेवा – नांदगाव शहरा जवळील गंगाधरी जवळ एसटी बस आणि अल्टो कारची धडक होत अपघात झाला. या मध्ये अल्टो कार मधील आई वंदना संतोष नलावडे (४०), मुलगा शुभम संतोष नलावडे ( २३) राहणार शिंदे पळाशे, तर मुलगी कल्याणी मनोज शिंदे (२२) राहणार महाड सांगवी या अपघातात जागीच ठार झाले. तर तीन वर्षीय बालक गंभीर जखमी झाले आहे.
जखमी बालकास पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, मंगळवार दि. १४ रोजी सकाळी १० ते ११ वाजेच्या दरम्यान मनमाड डेपोची एसटी बस क्र. MH १४ BT ४४ ९८ चाळीसगाव कडून नांदगावच्या दिशेने तर अल्टो कार क्र. MH १५ CD २०५७ चाळीसगावच्या दिशेने जात असताना गंगाधरी जवळील विठाई पेट्रोल पंपा समोर या बस गाडीचे आणि कारची समोरासमोर धडक झाली. अपघात इतका भीषण होता की, यामध्ये कारचा चक्काचूर झाला.
घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय बडे, पोलीस हवालदार राजू मोरे, शेख, करत आहे.
आमदार कांदे धावले मदतीला
अपघाताची माहिती नांदगाव शहरात वाऱ्यासारखी पसरली, आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. आमदार सुहास कांदे यांना देखील घटनेची माहिती मिळताच आमदार कांदे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. आणि अपघात ग्रस्तांसाठी तत्काळ मदत कार्य सुरू केले होते.
हेही वाचा –
G. V. Prakash Kumar : ए. आर. रहमानचा पुतण्या जीव्ही प्रकाश कुमारचा ११ वर्षाचा संसार मोडला
नाशिक : पाणीटंचाईने वैतागल्या अन् ग्रामपंचायतीवर मोर्चा काढत महिलांनी मांडला ठिय्या
इंडोनेशियातील पूरबळींची संख्या ५० वर, २७ बेपत्ता