LokSabha Elections 2024 | जे काम हाती घेते ते पूर्णच करते : सुनेत्रा पवार
बारामती : Bharat Live News Media वृत्तसेवा : बारामती मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार या मंगळवारी बारामती तालुक्याच्या दौर्यावर होत्या, त्यावेळी सावंतवाडी येथे ग्रामस्थांकडून सुनेत्रा पवार यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
सुनेत्रा पवार यांनी या वेळी आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात याच परिसरातून केली असल्याचं सांगत ओढा खोलीकरणासारखे उपक्रम राबवल्याचा फायदा झाल्याचं नमूद केले.
केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून अधिकाधिक प्रश्न मार्गी लागावेत यासाठी दुवा म्हणून मी काम करेन असं सांगतानाच मी जे काम हाती घेते ते पूर्णत्वाला नेतेच हे बारामतीकरांना ज्ञात असल्याचंही त्यांनी नमूद केले. दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी ग्रामस्थांच्या अडीअडचणीही जाणून घेतल्या.
हेही वाचा
Crime News : मुले चोरणार्या टोळीचा अखेर पर्दाफाश!
’पुनीत बालन ग्रुप’ने साकारले संविधान उद्यान
हा देश जितका हिंदूंचा तितकाच अल्पसंख्याकांचासुद्धा : अनिस सुंडके