Pune : गुरुद्वारांमध्ये विद्युतरोषणाई ; श्री गुरू नानक देवजी यांची आज जयंती
पुणे : पुढारी वृत्तसेवा : शीख धर्माचे पहिले गुरू आणि संस्थापक श्री गुरू नानक देवजी यांची जयंती (प्रकाश पुरब) सोमवारी (दि. 27) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्ताने गुरुद्वारामध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, गुरुद्वारामध्ये यानिमित्ताने विद्युतरोषणाई करण्यात आली असून, शीख समाजबांधव एकत्र येऊन उत्साहात, आनंदात हा दिवस साजरा करणार आहेत. गुरुद्वारांमध्ये गेल्या दोन ते तीन दिवसांपासून धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. जयंतीच्या दिवशीही दिवसभर वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. सध्या गुरुद्वारांमध्ये गुरुग्रंथ साहिबचे पाठ सुरू आहेत. सोमवारी अखंड पाठाची समाप्ती होणार आहे. कीर्तनासह दिवसभर प्रवचनांचे कार्यक्रम होतील. दिवसभर बांधवांना गुरुद्वारांमध्ये दर्शन घेता येणार आहे आणि दिवसभर लंगरची (प्रसाद) व्यवस्था करण्यात आली आहे. धार्मिक कार्यक्रमांसह सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले आहे.
कॅम्प येथील गुरुद्वारा गुरू नानक दरबारचे अध्यक्ष चरणजितसिंग सहानी म्हणाले की, शीख बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गुरुद्वारामध्ये गेल्या तीन दिवसांमध्ये धार्मिक कार्यक्रम सुरू असून, गुरुग्रंथ साहिबच्या अखंड पाठाची समाप्ती जयंतीच्या दिवशी होणार आहे. दिवसभर कीर्तन आणि कथांचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. तसेच, बांधवांसाठी लंगरचीही व्यवस्था करण्यात आली आहे. रेसकोर्सच्या येथे विनामूल्य पार्किंगची सुविधाही केली आहे. सायंकाळी चार ते रात्री एक वाजेपर्यंत धार्मिक कार्यक्रम होतील. धार्मिक उपक्रमांसह गुरुद्वारा समितीतर्फे गुरू नानक मेडिकल फाउंडेशनमध्ये तीन दिवसांपासून आरोग्य तपासणी शिबिर आणि रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. सकाळी आठ ते रात्री अकरा या वेळेत शिबिर होणार आहे.
The post Pune : गुरुद्वारांमध्ये विद्युतरोषणाई ; श्री गुरू नानक देवजी यांची आज जयंती appeared first on पुढारी.
पुणे : पुढारी वृत्तसेवा : शीख धर्माचे पहिले गुरू आणि संस्थापक श्री गुरू नानक देवजी यांची जयंती (प्रकाश पुरब) सोमवारी (दि. 27) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्ताने गुरुद्वारामध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, गुरुद्वारामध्ये यानिमित्ताने विद्युतरोषणाई करण्यात आली असून, शीख समाजबांधव एकत्र येऊन उत्साहात, आनंदात हा दिवस साजरा करणार आहेत. गुरुद्वारांमध्ये …
The post Pune : गुरुद्वारांमध्ये विद्युतरोषणाई ; श्री गुरू नानक देवजी यांची आज जयंती appeared first on पुढारी.