तारकर्लीत नौदल जवानांचा ताफा दाखल
ओरोस; पुढारी वृत्तसेवा : नौदल दिनाच्या निमित्ताने मालवण-तारकर्ली समुद्रात नौदल दलाच्या जवानांचा ताफा दाखल झाला असून भारतीय नौदलाच्या तोफांसह कार्यक्रमाची रंगीत तालीम सोमवार (दि. 27) पासून सुरू होणार आहे. नौसेना कार्यक्रमात नौसेनेच्या विविध युद्धनौका, लढाऊ विमाने सहभागी होणार आहेत. तर दुसरीकडे सागरी सुरक्षेतेच्या द़ृष्टीने 28 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीत होणार्या नौदलाच्या विविध कार्यक्रमाचे आयोजन, नियोजन अंतिम टप्प्यात आले आहे. 30 नोव्हेंबरनंतर समुद्रात रंगीत कवायती पाहायला मिळणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे भारतीय आरमार उभारणीत असलेले योगदान लक्षात घेऊन सिंधुदुर्ग येथे नौदल दिनाला विशेष कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार यंदाचा नौदल दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात साजरा होणार आहे. नौदलाने या कार्यक्रमासाठी विविध जलदुर्गांच्या पाहणी करून अंतिम ठिकाण म्हणून सिंधुदुर्ग किल्ला परिसराची निवड केली आहे. तारकर्ली येथे एमआयडीसीजवळ समुद्रावर नौदलाचा मुख्य कार्यक्रम होणार आहे. त्या द़ृष्टीने नौदलाच्या जवानांची हजेरी लागली आहेत. देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, राज्याचे मंत्री, अधिकारी, नौदलाचे अधिकारी, विदेशी पाहुणे यानिमित्ताने मालवणात दाखल होणार आहेत. यानिमित्ताने भव्यदिव्य शामियाना देखील उभारण्यात येत आहे. या शामियानाच्या कामाला वेग आला आहे.
शामियानाच्या ठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पंतप्रधानांच्या हस्ते राजकोटवर छत्रपतींचा पुतळा अनावरण राजकोट किल्ला हा ऐतिहासिक किल्ला आहे. राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे या किल्ल्याला पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्व प्राप्त होणार आहे .
दांडी ते देवबाग परिसर गजबजणार
जनतेला हा कार्यक्रम मोठ्या स्क्रीनद्वारे पाहता यावा यासाठीसमुद्रकिनार्यावर स्क्रीन लावण्यात येणार आहेत. नौदल दिनासाठी नौदल दलाचे जवान आणि नौका मालवणात दाखल झाल्या असून 30 नोव्हेंबरनंतर खर्या अर्थाने समुद्रात रंगीत कवायती पाहायला मिळणार आहेत. 2 ते 4 डिसेंबर या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नौदल दिनाचा मुख्य कार्यक्रम होणार आहे. या दिवशी मालवणात ठिकठिकाणी बॅरिकेट्स लावण्याचे काम सुरू झाले आहे. ठिकठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था निर्माण केली आहे. समुद्रकिनारी जाणार्या लोकांसाठी योग्य ते नियोजन केले असून समुद्रकिनारी वाहने उभी करण्यासाठी जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. लोकांची एकाच ठिकाणी मोठी गर्दी होणार नाही या दृष्टीने विशेष काळजी घेण्यात आली आहे.
राजकोट, तारकर्ली गजबजणार..
2 ते 4 डिसेंबर या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नौदल दिनाचा मुख्य कार्यक्रम होणार आहे. नौदल दिनाच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने राजकोट, तारकर्ली समुद्रकिनारा गजबजून जाणार आहे. जनतेला हा कार्यक्रम मोठ्या स्क्रीनद्वारे पाहता यावा यासाठीसमुद्रकिनार्यावर स्क्रीन लावण्यात येणार आहेत.
The post तारकर्लीत नौदल जवानांचा ताफा दाखल appeared first on पुढारी.
ओरोस; पुढारी वृत्तसेवा : नौदल दिनाच्या निमित्ताने मालवण-तारकर्ली समुद्रात नौदल दलाच्या जवानांचा ताफा दाखल झाला असून भारतीय नौदलाच्या तोफांसह कार्यक्रमाची रंगीत तालीम सोमवार (दि. 27) पासून सुरू होणार आहे. नौसेना कार्यक्रमात नौसेनेच्या विविध युद्धनौका, लढाऊ विमाने सहभागी होणार आहेत. तर दुसरीकडे सागरी सुरक्षेतेच्या द़ृष्टीने 28 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीत होणार्या नौदलाच्या विविध कार्यक्रमाचे …
The post तारकर्लीत नौदल जवानांचा ताफा दाखल appeared first on पुढारी.