शेअर मार्केटच्या आमिषाने, मित्रानेच घातला सव्वादोन कोटींचा गंडा
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : ऑनलाइन ट्रेडिंगचा व्यवसाय असून, त्यामध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळवून देतो, असे आमिष दाखवत एकाने चौघांना 2 कोटी 29 लाखांचा गंडा घातला. मित्रानेच ही फसवणूक केली आहे. याप्रकरणी समाधान शंकर कदम (वय 45, रा. बालेवाडी) यांनी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नीलेश भास्कर टिळे (रा. परफेक्ट 10, बालेवाडी) याच्यावर पोलिसांनी फसवणूक, महाराष्ट्रातील ठेवीदाराचे हितसंरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मे 2023 ते गुन्हा दाखल होईपर्यंतच्या काळात घडली आहे. फिर्यादी समाधान कदम हे बाणेर येथील एका खासगी कंपनीत अॅडमिन हेड आहेत. कदम आणि नीलेश टिळे हे मित्र आहेत.
एक वर्षापूर्वी मधुबन सोसायटी येथे कदम आणि टिळे भेटले हे भेटले. या वेळी टिळे हा शेअर मार्केटमध्ये ऑनलाइन ट्रेडिंग करत असल्याचे कदम यांना सांगितले. ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास भरपूर नफा मिळतो असे टिळे याने सांगितले. टिळे हा जवळचा मित्र असल्याने कदम यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. तसेच, कदम यांनी नातेवाईक आणि मित्रांना टिळे याच्याकडे गुंतवणूक करायला सांगितले. दरम्यान, कदम यांनी वेळोवेळी बचत, मित्रांकडून हातउसने आणि वडिलोपार्जित सोने विकून 1 कोटी 81 लाख 95 हजारांची टिळे याच्याकडे गुंतवणूक केली.
तसेच, कदम यांच्या पत्नीने 25 लाख, मित्र रणजित कदम यांनी 10 लाख, दुसरा मित्र अजय कुमार यांनी 15 लाखांची गुंतवणूक केली आहे. गुंतवणुकीनंतर टिळे याने पहिले दोन-तीन महिने नफा दिला. त्यानंतर पैसे देणे बंद केले. याबाबत कदम यांनी टिळे याच्याकडे विचारणा केली असता तो उडवाउडवीचे उत्तर देऊ लागला. कदम यांनी त्यांच्या मित्राकडे टिळे यांच्यासंदर्भातील चौकशी केली असता, त्याने याप्रकारे अनेकांची फसवणूक केल्याचे लक्षात आले. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक रत्नदीप गायकवाड करत आहेत.
हेही वाचा
तुकोबारायांच्या पालखीचे 28 जूनला प्रस्थान; पालखी प्रस्थान व आगमन कार्यक्रम जाहीर
कोट्यधीश पानवाला सोन्याचे दागिने घालून विकतो पान!
Nashik News | बेशिस्त चालकांना दणका, पंधरा महिन्यांत ६८ कोटींचा दंड