गडचिरोली : तलवारीने केक कापून हिरोगिरी करणे तरुणांना भोवले; आरमोरी पोलिसांची कारवाई
गडचिरोली; पुढारी वृत्तसेवा : सामसूम रस्ता पाहून हिरोगिरी करणे काही तरुणांच्या चांगलेच अंगलट आले आहे. आरमोरी-रामाळा रस्त्यावर मध्यरात्री बार उडवून तलवारीने केक कापणाऱ्या चार तरुणांना आरमोरी पोलिसांनी आज (दि. २६) अटक केली.
लोकेश विनोद बोटकावार (२१), लोकमित्र खुशाल ठाकरे (२५), बादल राजेंद्र भोयर (२३) व पवन मनोहर ठाकरे (२५) अशी अटकेतील आरोपींची नावे असून, राहुल मनोहर नागापुरे (२८) हा फरार आहे. हे सर्वजण आरमोरी शहरातील बाजारटोली येथील रहिवासी आहेत. शनिवारी (दि. २५) रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास पाचही तरुण दोन मोटारसायकलीसह आरमोरी-रामाळा रस्त्यावर गेले. थंडीचे दिवस असल्याने रस्त्यावर सन्नाटा होता. हीच संधी साधून या तरुणांनी बार उडवून रस्त्याच्या मधोमध केक ठेवला आणि तो तलवारीने कापला. यावेळी तरुणांनी प्रचंड आरडोओरडही करत होते. रविवारी मध्यरात्रीपर्यंत ही हिरोगिरी सुरु होती. एवढ्यात गस्तीवर असलेले पोलिस घटनास्थळी पोहचले. त्यांनी चार जणांना अटक केली. त्यांच्याकडून १ हजार ५०० रुपये किमतीची एक धारदार तलवार, ५५ हजार रुपये किमतीची एक ऍ़क्टीवा गाडी, ४० हजारांची एक स्प्लेंडर प्ल्स गाडी असा एकूण ९६ हजार ५०० रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक कुमार चिंता, यतीश देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी मयुर भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप मंडलिक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. पोलिस उपनिरीक्षक संतोष कडाळे घटनेचा तपास करीत आहेत.
The post गडचिरोली : तलवारीने केक कापून हिरोगिरी करणे तरुणांना भोवले; आरमोरी पोलिसांची कारवाई appeared first on पुढारी.
गडचिरोली; पुढारी वृत्तसेवा : सामसूम रस्ता पाहून हिरोगिरी करणे काही तरुणांच्या चांगलेच अंगलट आले आहे. आरमोरी-रामाळा रस्त्यावर मध्यरात्री बार उडवून तलवारीने केक कापणाऱ्या चार तरुणांना आरमोरी पोलिसांनी आज (दि. २६) अटक केली. लोकेश विनोद बोटकावार (२१), लोकमित्र खुशाल ठाकरे (२५), बादल राजेंद्र भोयर (२३) व पवन मनोहर ठाकरे (२५) अशी अटकेतील आरोपींची नावे असून, राहुल …
The post गडचिरोली : तलवारीने केक कापून हिरोगिरी करणे तरुणांना भोवले; आरमोरी पोलिसांची कारवाई appeared first on पुढारी.