पाथर्डी : दुग्धविकास मंत्र्यांना दुग्धाभिषेक घालणार

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : शासनाच्या हमीभावाप्रमाणे दुधाला भाव द्या,पशु खाद्याच्या किमती कमी करा,जनावरांसाठी चारा डेपो सुरु करा, या मागण्यांची पूर्तता न झाल्यास या खात्याच्या मंत्र्यांच्या पुतळ्याला येत्या एक डिसेंबरला दुग्धाभिषेक घालून आंदोलन केले जाईल, असा इशारा दूधउत्पादनकांनी दिला आहे.. दूध उत्पादक आदिनाथ देवढे, आनंद सानप, ज्ञानेश्वर खवले, अक्षय वायकर, शहादेव भाबड, दत्तात्रय बडे, … The post पाथर्डी : दुग्धविकास मंत्र्यांना दुग्धाभिषेक घालणार appeared first on पुढारी.
#image_title

पाथर्डी : दुग्धविकास मंत्र्यांना दुग्धाभिषेक घालणार

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : शासनाच्या हमीभावाप्रमाणे दुधाला भाव द्या,पशु खाद्याच्या किमती कमी करा,जनावरांसाठी चारा डेपो सुरु करा, या मागण्यांची पूर्तता न झाल्यास या खात्याच्या मंत्र्यांच्या पुतळ्याला येत्या एक डिसेंबरला दुग्धाभिषेक घालून आंदोलन केले जाईल, असा इशारा दूधउत्पादनकांनी दिला आहे.. दूध उत्पादक आदिनाथ देवढे, आनंद सानप, ज्ञानेश्वर खवले, अक्षय वायकर, शहादेव भाबड, दत्तात्रय बडे, तुकाराम देवढे, महेश दौंड, प्रेमचंद खंडागळे, भीम गर्जे, महादेव मरकड, डॉ. सुहास सोनवणे,
गणेश देवढे यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले की, दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी 3.5 फॅट व 8.5 एसएनएफसाठी 34 रूपये भाव देण्याचे जाहीर केले होते.
मात्र, शासकीय दूध संघ आणि खासगी दूध संस्था मात्र दुधाला 25-26 रूपये प्रति लिटरप्रमाणे भाव देत आहे. चारा व पशुखाद्याचे भाव कडाडले असल्याने दूध व्यवसाय कोलमडण्याच्या मार्गावर आहे. दूधभाववाढीचा मुद्दा उपस्थित केला की जिल्ह्यात दूध भेसळ अधिक असल्याचे कारण दिले जाते, ते चुकीचे आहे. सध्या पाथर्डी व शेवगाव तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती गंभीर असूनही दोन्ही तालुक्यांतील 9 मंडलांतील अनेक गावे दुष्काळी यादीतून वगळली आहेत. दूध उत्पादकांसमोर लंपी आजारासोबतच चारा व पशुखाद्यांच्या किंमतींचे संतुलन साधून दूधव्यवसाय टिकवणं एक आव्हान ठरलं आहे. तशातच शासकीय हमीभाव झुगारून देत दूध उत्पादकांना लुटणार्‍या प्रकल्पांवर कारवाई करा, अशी मागणी करण्यात आली.
दूध भाव कमी होण्यास भेसळीचं कारण सांगणार्‍या मंत्र्यांनी प्रशासनाच्या माध्यमातून गत 5 वर्षात किती कारवाया केल्या, असा सवाल करीत आंदोलनकर्त्यांनी दूध भाव मूल्य आयोगाची स्थापना करून जनावरांना विमा कवच योजना उपलब्ध करून द्यावी. तसेच प्रत्येक गावात पशुवैद्यकीय केंद्र सुरू करा, अशा मागण्या केल्या आहेत. येत्या 1 डिसेंबरला पाथर्डीतील नाईक चौकात मंत्र्यांना दुग्धाभिषेक घालण्याचे अनोखे आंदोलन केले जाणार आहे.
हेही वाचा
कच्च्या हळदीचा वापर हिवाळ्याच्या दिवसांमध्ये अधिक लाभदायक
गडचिरोली: पिकांची राखण जीवावर बेतली, रानटी हत्तीच्या हल्ल्यात शेतकरी ठार
रंगभूमीची दारे माझ्यासाठी पुणेकरांनी उघडली : दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे
 
The post पाथर्डी : दुग्धविकास मंत्र्यांना दुग्धाभिषेक घालणार appeared first on पुढारी.

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : शासनाच्या हमीभावाप्रमाणे दुधाला भाव द्या,पशु खाद्याच्या किमती कमी करा,जनावरांसाठी चारा डेपो सुरु करा, या मागण्यांची पूर्तता न झाल्यास या खात्याच्या मंत्र्यांच्या पुतळ्याला येत्या एक डिसेंबरला दुग्धाभिषेक घालून आंदोलन केले जाईल, असा इशारा दूधउत्पादनकांनी दिला आहे.. दूध उत्पादक आदिनाथ देवढे, आनंद सानप, ज्ञानेश्वर खवले, अक्षय वायकर, शहादेव भाबड, दत्तात्रय बडे, …

The post पाथर्डी : दुग्धविकास मंत्र्यांना दुग्धाभिषेक घालणार appeared first on पुढारी.

Go to Source