बाहेर ऊस आत गांजा! गिरगावात शेतकरी भावांची करामत; १३ लाखाचा गांजा जप्त
जत; पुढारी वृत्तसेवा : गिरगाव (ता. जत) येथील ऊस शेतीत छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या गांजा शेतीवर छापा टाकून १३ लाख ६८ हजार ६५० रुपयांचा १३६ किलो गांजा जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी सिकंदर बगसू कोतवाल (वय ५०) व उस्मान बगसू कोतवाल (वय ५०) (दोघेही रा.कोतवाल वस्ती गिरगाव ता. जत) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस कॉन्स्टेबल इंद्रजीत गोदे यांनी याबाबत उमदी पोलिसात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सिकंदर कोतवाल याला अटक केली असून उस्मान कोतवाल हा फरार आहे. ही कारवाई शनिवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास केली. याबाबत अधिक माहिती अशी की, गिरगाव येथील कोतवाल वस्ती या ठिकाणी ऊस शेतीत गांजा लागवड केल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे यांना मिळाली होती. पोलिसांनी कोतवाल वस्ती या ठिकाणी छापा टाकला असता ऊस शेतात एका बांधावर गांजा लागवड केल्याचे दिसून आले. शेजारी कांद्याच्या शेतात एक व्यक्ती उभा होता. हे शेत कोणाचे आहे असे पोलिसांनी विचारणा केली असता माझेच आहे सांगितले. सिकंदर कोतवाल नाव असल्याचे सांगितले. बाजूच्या शेतात ही गांजा असल्याचे दिसून आले. सदरची शेती ही उस्मान कोतवाल याची असल्याचे स्पष्ट झाले. दोन्ही शेतातील ओला गांजा उपटून काढण्यात आला. पोलिसांनी सुमारे १३ लाख ६८ हजार ६५० रूपयांचा १३६ किलो गांजा जप्त केला.
या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, नामदेव काळेल, पोलीस उपनिरीक्षक शरिष शिंदे, आप्पासाहेब हाके, प्रशांत कोळी, इंद्रजीत गोदे, सोपान भडे यांनी सहभाग घेतला. या कारवाईनंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे म्हणाले पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली व उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैद्य व्यवसायावर कडक कारवाई सुरू आहे. असे व्यवसाय असणाऱ्यांची नावे गोपींनीय पद्धतीने माहिती द्यावीत, असेही आवाहन केले.
हेही वाचा :
सातारच्या पालकमंत्र्यांची अरेरावी खपवून घेणार नाही; पाण्यासाठी खासदारकीचा राजीनामा देऊ : संजय पाटील
कोल्हापूरचा ऊस दर पॅटर्न सांगलीत राबवा : राजू शेट्टी
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही कृष्णा कोरडीच
The post बाहेर ऊस आत गांजा! गिरगावात शेतकरी भावांची करामत; १३ लाखाचा गांजा जप्त appeared first on पुढारी.
जत; पुढारी वृत्तसेवा : गिरगाव (ता. जत) येथील ऊस शेतीत छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या गांजा शेतीवर छापा टाकून १३ लाख ६८ हजार ६५० रुपयांचा १३६ किलो गांजा जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी सिकंदर बगसू कोतवाल (वय ५०) व उस्मान बगसू कोतवाल (वय ५०) (दोघेही रा.कोतवाल वस्ती गिरगाव ता. जत) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस कॉन्स्टेबल …
The post बाहेर ऊस आत गांजा! गिरगावात शेतकरी भावांची करामत; १३ लाखाचा गांजा जप्त appeared first on पुढारी.