पुढारी ऑनलाईन डेस्क : तुम्ही सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असाल तर तुम्हाला ‘मोये मोये’ हे गाणे नक्कीच ऐकू आले असणार. सध्या या गाण्याचा ट्रेन्ड सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहे. विशेष म्हणजे लोक या गाण्याचा उच्चार चुकीचा करत आहेत ज्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. व्हायरल झालेल्या गाण्याचे बोल ‘मोये मोये’ नाहीत. मग ते काय आहेत? आणि हे गाणं अचानक इतकं व्हायरल कसं झालं? जाणून घेवूयात… (Moye Moye Trend)
‘मोये मोये’ एक सर्बियन म्युझिक व्हिडिओ
हा एक सर्बियन म्युझिक व्हिडिओ आहे. या म्युझिक व्हिडिओचे नाव आहे ‘Dzanum’. हे सर्बियन गायिका तेया डोरा हिने गायले आहे. हे गाणे तेया डोरा यांनी सर्बियन रॅपर स्लोबोदान वेल्कोविक कोबीसोबत लिहिले होते. यासोबतच ती गाण्याच्या म्युझिक व्हिडिओंमध्येही दिसत आहे. आतापर्यंत या म्युझिक व्हिडिओला यूट्यूबवर 57 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. (Moye Moye Trend )
‘दाजनम’ हे एक वेदनादायक गाणे आहे. अचानक लोकांनी या गाण्यावर रिल्स बनवायला सुरुवात केली. दुखदायक आणि अनेक प्रकारचे व्हिडिओ बनवण्यासाठी सोशल मीडियावर ॲक्टिव असणाऱ्या युजर्सनी या गाण्याचा वापर करण्यास सुरूवात केली. या गाण्यावर फनी रील्स आणि मीम्सही बनवले जात आहेत. सोशल मीडियावर ‘मोये मोये’ ट्रेंड कसा सुरू झाला हे देखील काही कमी मनोरंजक नाही. याची सुरुवात TikTok वर झाली. लवकरच या गाण्याचे अनेक व्हिडिओ इन्स्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबवर बनवले जात आहेत.
कसे आहे नेमके गाणे?
या गाण्यात ‘मोये मोये’ कुठेही म्हटलेले नाही, तर ‘मोजे मोर’ असा उच्चार आहे. गुगल ट्रान्सलेटरच्या मते मोजे मोर म्हणजे हिंदीत माझा समुद्र. ‘मात्र, सोशल मीडियावर या गाण्यावर बहुतांशी फनी रील्स तयार होत आहेत. मात्र, वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाल्यानंतर यूजर्सनी या गाण्यावर वेदनादायक व्हिडिओही शेअर केले आहेत. या गाण्याला मिळालेल्या जबरदस्त यशामुळे गायिका तेया डोरा खूप खूश आहे. सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांनी युजर्सचे आभारही मानले आहेत. लोकांना त्याचा अर्थ कळत नसला तरी त्याचे संगीत त्यांना खूप आकर्षित करत आहे. संगीताला सीमा नसतात याचंही हे उदाहरण आहे. हे विविध संस्कृतींच्या लोकांना जोडण्याचे काम करते. ‘मोजे मोर’ हे गाणेही तेच करत आहे.
View this post on Instagram
A post shared by TEYA DORA (@iamteyadora)
हेही वाचा :
Aditya-L1 Mission Updates | आदित्य L1 बाबत मोठी अपडेट; लवकरच पोहचणार ‘लॅगरेंज पॉईंट L1’वर, इस्रो अध्यक्षांची माहिती
Nagar News : खर्डा येथील जनसुविधा केंद्र हलविले
नाशिक : ठेंगोडा गणपती मंदिरात चोरी, दोघांनी दानपेटी फाेडत लांबवले ७५ हजार
The post सोशल मीडियावर ट्रेन्ड होणाऱ्या ‘मोये मोये गाण्याचे हे आहेत खरे बोल जाणून घ्या… appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : तुम्ही सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असाल तर तुम्हाला ‘मोये मोये’ हे गाणे नक्कीच ऐकू आले असणार. सध्या या गाण्याचा ट्रेन्ड सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहे. विशेष म्हणजे लोक या गाण्याचा उच्चार चुकीचा करत आहेत ज्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. व्हायरल झालेल्या गाण्याचे बोल ‘मोये मोये’ नाहीत. मग ते काय आहेत? आणि …
The post सोशल मीडियावर ट्रेन्ड होणाऱ्या ‘मोये मोये गाण्याचे हे आहेत खरे बोल जाणून घ्या… appeared first on पुढारी.