परभणी : ताडकळसमध्ये वादळी वा-यासह जोरदार अवकाळी पाऊस
ताडकळस; Bharat Live News Media वृत्तसेवा : ताडकळस परिसरात सायंकाळी अवकाळी पाऊस झाला. आज (दि. ९) सायंकाळी ५:१५ वाजताच्या दरम्यान वादळी वा-यासह जोरदार पाऊस झाला.
अचानक आलेल्या वादळीवा-यासह जोरदार पाऊसामुळे ताडकळस शहरातील फेरीवाले, भाजीपाला विक्रेते, दूकानदार हैराण झाल्याचे पहावयला मिळाले. अनेक नागरिकाच्या घरावरील पञे वाऱ्याने उडाली. सध्याच्या हंगामातील शेतात हळद काढणी वाळवणी करणा-या शेतक-यांची या अवकाळी पाऊसाने एकच तारांबळ उडवली. या वादळीवा-याह अचानक कोसळलेल्या अवकाळी पाऊसाने उन्हाळी ज्वारी, भाजीपाला आंबा पिकाला याचा फटका बसला आहे.
Latest Marathi News परभणी : ताडकळसमध्ये वादळी वा-यासह जोरदार अवकाळी पाऊस Brought to You By : Bharat Live News Media.