भीमा कोरेगाव प्रकरण; प्रा. शोमा सेन यांना जामीन
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी प्रोफेसर शोमा सेन यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने काही अटींवर प्रा. सेन यांना जामीनावर सोडण्याची परवानगी दिली आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे.
प्रोफेसर शोमा सेन यांना महाराष्ट्र सोडता येणार नाही, त्यांनी त्यांचा पासपोर्ट जमा करावा, त्यांनी त्यांच्या राहत्या घराची माहिती NIA या तपास यंत्रणेला द्यावी, तसेच सुरू असलेला मोबाईल क्रमांक त्यांनी एनआयए अधिकाऱ्यांना द्यावा, अशा अटींसह सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन दिला आहे. (Bhima Koregaon Case)
प्रा. शोमा यांचा मोबाईलचा जीपीएस ॲक्टिव्ह राहावा आणि त्यांचा फोन NIA या तपासयंत्रणेतील अधिकाऱ्याच्या फोनशी जोडला जावा जेणेकरून लोकेशन निश्चित करता येईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. पुढे जर या अटी आणि शर्तीचा भंग झाला तर, जामीन रद्द केला जाईल. तसेच प्रा.शोमा सेन यांच्यावर खटला चालवला जाईल, असे देखील सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीवेळी स्पष्ट केले आहे. (Bhima Koregaon Case)
Supreme Court grants bail to Professor Shoma Sen, accused in Bhima Koregaon case. pic.twitter.com/lzd4Jhc3vJ
— ANI (@ANI) April 5, 2024
भीमा कोरेगाव येथील हिंसाचारासह नक्षलवाद्यांसोबत कथित संबंधांच्या आरोपाखाली 2018 पासून सेन तुरूंगात आहेत. हे प्रकरण याप्रकरणातील सह आरोपी गोंसाल्वेस आणि फरेरा यांच्यासारखे आहे का? असा सवाल न्या. बोस यांनी सेन यांची बाजू मांडणारे अँड. ग्रोवर यांना विचारला होता. परंतु, हे प्रकरण त्याहून गंभीर आहे. सेन यांना तुरूंगात ठेवण्याचे कुठले कारण नाही. त्या पाच वर्षांहून अधिक काळापासून तुरूंगात आहेत. खटला अद्याप सुरू झालेला नसून आरोप देखील निश्चित करण्यात आलेले नसल्याचे ग्रोव्हर यांनी खंडपीठाच्या निर्दशनास आणून दिले होते. (Bhima Koregaon Case)
हेही वाचा:
Bhima Koregaon Case: प्रा. शोमा सेन यांच्या याचिकेवर सुनावणीस सुप्रीम कोर्टाची सहमती
Bhima Koregaon case:भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी वर्नोन गोन्साल्विस, अरुण फेरेरिया यांना जामीन
Bhima Koregaon Violence : सामाजिक कार्यकर्ते आनंद तेलतुंबडेंची तुरुंगातून सुटका
The post भीमा कोरेगाव प्रकरण; प्रा. शोमा सेन यांना जामीन appeared first on Bharat Live News Media.