Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: खासदार नवनीत राणा यांचे ‘जात प्रमाणपत्र’ वैध असल्याचा निर्णय आज (दि.४) सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करत सर्वोच्च सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे राणा यांचा आगामी लोकसभा निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.
न्यायालयाच्या या निकालामुळे लोकसभा निवडणूकीपूर्वी राणा यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध आहे की नाही यावर सर्वोच्च न्यायालयात आज महत्वपूर्ण निकाल दिला. दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीसाठी त्या अमरावतीतून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या पार्श्वभूमीवर अमरावतीमधील दसरा मैदानात सभेची जय्यत तयारी सुरू आहे.
ज्या जात प्रमाणपत्राच्या आधारावर त्यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राखीव प्रवर्गातून निवडणूक लढवली होती. यानंतर बॉम्बे हायकोर्टाने नवनीत राणा यांनी जात प्रमाणपत्र फसवणुकीने मिळविल्याच्या कारणावरून ते रद्द केले होते. त्यानंतर राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. पुढे बोगस जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणाचा दोनही गटाचा युक्तीवाद 28 फेब्रुवारीला पूर्ण झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला होता. आज याप्रकरणी अंतिम निकाल आला आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवनीत राणा यांच्या उमेदवारीसाठी सर्वोच्च न्यायालयाचा आजचा निकाल अत्यंत महत्वाचा आहे.
नवनीत राणा यांच्या उमेदवारीमुळे युतीत नाराजी?
नवनीत राणा यांनी अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या वतीने नवनीत राणा यांना अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्याच्या विरोधात महायुतीमध्ये बंड झाल्याचे दिसून येतेय. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. तर प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांनी देखील तो राणा यांच्या उमेदवारीला विरोध करत स्वतंत्र उमेदवार दिला आहे. भाजपमध्ये स्थानिक पदाधिकारी देखील नवनीत राणा यांच्या उमेदवारीवर नाराज असल्याची चर्चा आहे.
Supreme Court allows Lok Sabha MP Navneet Rana and sets aside the Bombay High Court order that had cancelled her caste certificate that she used to contest the 2019 Lok Sabha polls in a reserved category seat. pic.twitter.com/KysZszp7HI
— ANI (@ANI) April 4, 2024
Latest Marathi News मोठी बातमी| खासदार नवनीत राणा यांना मोठा दिलासा; ‘जात प्रमाणपत्र’ वैध Brought to You By : Bharat Live News Media.