हिंगोली: खासदार हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला भाजपचा विरोध
हिंगोली: Bharat Live News Media वृत्तसेवा : महायुतीकडून हिंगोली लोकसभेसाठी शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्याने निराश झालेल्या भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज (दि.३१) बैठक घेतली. हिंगोली लोकसभेला कमळाचाच उमेदवार द्यावा, हेमंत पाटील हे निवडून येणार नाहीत. पक्षश्रेष्ठींनी उमेदवार न बदलल्यास आमच्यापैकी एकास धनुष्यबाणाची उमेदवारी दिली, तरी आम्ही लढण्यास तयार आहोत, असा निर्धार केल्याने हेमंत पाटील यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. Hingoli Lok Sabha Election
विशेष म्हणजे सोमवारीच भाजपचे शिष्टमंडळ पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी परभणी येथे जाणार आहे. महायुतीमध्ये भाजपच हिंगोली लोकसभेत कमळ फुलविण्यासाठी आक्रमक झाल्याने शिंदे सेनेची डोकेदुखी वाढली आहे. Hingoli Lok Sabha Election
या बैठकीस आमदार तान्हाजी मुटकुळे, आ. भिमराव केराम, आ. नामदेव ससाणे, जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे, माजी खासदार शिवाजी माने, माजी आमदार गजानन घुगे, माजी आमदार रामराव वडकुते, रामदास पाटील सुमठाणकर, कैलास काबरा, मिलिंद यंबल, उमेश नागरे, प्रशांत सोनी यांच्यासह हिंगोली लोकसभा मतदार संघातील भाजपचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
भाजपकडून मागील तीन वर्षापासून प्रवास योजनेच्या माध्यमातून संघटन बांधणी करण्यात आली होती. विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्याविरोधात जनमत असल्याचे सातत्याने सांगितल्या जात होते. कोणत्याही परिस्थितीत हिंगोली लोकसभा भाजपलाच सोडण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत होती. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे चार वेळेस शिष्टमंडळाने जावून वस्तुस्थिती जावून सांगितली होती. तरी सुद्धा हेमंत पाटील यांनाच उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने इच्छुकांसह भाजप कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली.
बैठकीत आक्रमक झालेले कार्यकर्ते कुणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी सोमवारी परभणी येथे जावून पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हेमंत पाटील यांच्या उमेदवारीचा फेरविचार करावा किंवा उमेदवार बदलावा. कमळ चिन्ह न दिल्यास धनुष्यबाणावरही लढण्याची तयारी असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीच्या सुरूवातीलाच भाजप कार्यकर्त्यांनी शिंदे सेनेच्या विरोधात रोष व्यक्त करून प्रचंड घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांनी ही जागा भाजपलाच द्यावी, अशी मागणी लावून धरली. त्यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. अनेक कार्यकर्त्यांनी तर थेट रामदास पाटील सुमठाणकर यांच्या नावाची घोषणाबाजी केल्याने बहुतांश कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र असल्याचे दिसून आले. परिणामी हेमंत पाटील यांच्यासमोर अडचणी वाढल्याचे चित्र आहे.
हेही वाचा
हिंगोली : अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या कारसह १ लाख ३० हजाराचा मुद्देमाल जप्त
हिंगोली लोकसभेसाठी हेमंत पाटील फायनल! शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी जाहीर
Lok Sabha Election 2024 | अनिश्चिततेच्या हिंदोळ्यावर झुलतेय महायुतीची उमेदवारी
Latest Marathi News हिंगोली: खासदार हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला भाजपचा विरोध Brought to You By : Bharat Live News Media.