Weekly Horoscope | साप्ताहिक राशीभविष्य १ ते ७ एप्रिल २०२४
चिराग दारूवाला :
चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.
मेष : या आठवड्यात काहीतरी नवीन शिकण्याची संधी मिळेल, असे श्रीगणेश सांगतात. अल्प परिश्रमात भरीव रक्कम मिळण्याची शक्यता. तुमच्या संभाषण कौशल्यावर काम करा. इतर लोकांच्या कामात हस्तक्षेप टाळा. तुम्ही कर्जासाठी पात्र ठराल. त्यामुळे या आठवड्यात तुमच्या प्रकल्पाच्या प्रक्रियेला गती मिळेल. तुमचे नातेसंबंध स्थिर राहतील. जोडीदाराची साथ लाभेल. आरोग्य चांगले राहिल.
वृषभ : आपण प्रत्येक गोष्टीसाठी प्राधान्यक्रम निश्चित कराल. चुकांची जबाबदारी घ्याल. जीवनसाथी शोधण्यासाठी हा एक उत्तम आठवडा आहे. दातांच्या समस्या तुम्हाला त्रास देतील त्यामुळे कोल्डड्रिंक्सपासून दूर रहा. जोडीदारासोबत वेळ चांगला जाईल. विशेषत: रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा आठवडा उत्तम आहे, असे श्रीगणेश सांगतात.
मिथुन: या आठवड्यात महत्त्वाच्या कामाची जबाबदारी तुमच्यावर सोपवली जावू शकते. तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पाऊल टाकणे भाग पडेल, असे श्रीगणेश सांगतात. महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्या. जोडीदार तुमच्या काही सवयी बदलण्याचा प्रयत्न करेल. याचा थोडा त्रास होईल; पण त्यांच्या सल्ल्याचे पालन केल्याने तुम्हाला खूप फायदा होईल. रक्तदाबाच्या समस्यांकडे दुर्लक्ष करु नका.
कर्क : या आठवड्यात आत्मपरीक्षणासाठी योग्य आहे. यामुळे तुमच्या आत्मविश्वास वाढीबरोबरच तुमचे विचार स्पष्ट होण्यास मदत होईल. तुम्ही भविष्यासाठी योजनांवरही विचार कराल. आर्थिक स्थिती चांगली असेल. मंगळ तुमच्या राशीवर नकारात्मक प्रभाव आणेल, त्यामुळे आठवड्याच्या उत्तरार्धात आरोग्याच्या बाबतीत दक्ष राहणे चांगले. घरगुती उपाय केल्याने तुमच्या आरोग्याशी संबंधित समस्यांवर मात करण्यास मदत होईल, असे श्रीगणेश म्हणतात.
सिंह: श्रीगणेश सांगतात की, या आठवड्यात तुम्हाला कार्यक्रमात चमकाल. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला पैशाचा नवीन स्रोत मिळू शकेल. कोणतेही कामातील विलंब टाळण्यासाठी पर्यायी व्यवस्था ठेवा. सुसंगत जोडीदार लाभण्यासाठी योग्य आठवडा आहे. आठवड्याच्या उत्तरार्धात तुम्हाला किरकोळ पाठदुखी किंवा सांधेदुखीचा सामना करावा लागू शकतो.
कन्या: श्रीगणेश सांगतात की, या आठवड्यात तुम्ही उत्साही असाल. घरातील आरामाचा आनंद घ्याल.आर्थिक समस्यांवर उपाय सापडतील. लोकही तुम्हाला मदत करतील. आठवड्याच्या मध्यात थोडी अस्वस्थता जाणवेल. नैराश्य टाळण्यासाठी मित्रांसोबत वेळ घालवा. या आठवड्यात तुमच्या नातेसंबंधात थोडे लक्ष द्यावे लागेल. पालकांच्या सल्ल्याचे पालन करा. साखरेची पातळी नियंत्रणात ठेवल्यास आरोग्य चांगले राहील.
तूळ : श्रीगणेश म्हणतात की, आठवडा खूप संतुलित जाईल. तुम्हाला अद्भुत लोकांच्या भेटीचा आनंद मिळेल. तुम्ही इतरांशी शांततेने संवाद साधाल. टीकाकारांकडे दुर्लक्ष करुन व्यवसायावर लक्ष केंद्रीत करा. जोडीदाराच्या वागण्यातील सकारात्मक बदलाने तुम्ही सुखावाल. मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
वृश्चिक: श्रीगणेश सांगतात की, तुमच्यासाठी हा आठवडा आश्चर्याने भरलेला असेल. प्रियजनांच्या उपस्थितीबद्दल कृतज्ञ व्हाल. ठरवलेले उद्दिष्ट गाठाल. तुमच्यावर परिणाम होत नसलेल्या गोष्टींबाबत अतिसंवेदनशील होऊ नका. टीकाकारांच्य बोलण्याकडे दुर्लक्ष करा. अध्यात्मिक अनुभव तुमचा विश्वास टिकवून ठेवण्यास मदत करेल. सप्ताहात घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल.
धनु: या आठवड्यात सुरू असलेले प्रकल्प पूर्ण होतील. आर्थिक स्पष्टता प्राप्त होईल. तुमच्या प्रयत्नांमुळे इतर लोक तुमचा आदर करतील, असे श्रीगणेश सांगतात. एखाद्या व्यक्तीमुळे नाराज होऊ शकता. अस्वस्थ मनाचा तुमच्या नातेसंबंधांवर नकारात्मक प्रभाव पडेल. शांत राहा. तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या शकांचे निरसण करावे लागले. आरोग्य चांगले राहील परंतु तुम्हाला तुमच्या मानसिक आरोग्य बिघडणार नाही याची काळजी घ्यावी लागले.
मकर: या आठवड्यात मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. महत्त्वपूर्ण आर्थिक व्यवहारांवर सही कराल. व्यावसायिक भागीदारामध्ये वाद होण्याची शक्यता; पण काळजी करू नका, ही परिस्थिती जास्त काळ चालू राहणार नाही. तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींमुळे चिंतेत असाल. तुमच्या नात्यात काही समस्या निर्माण होतील. मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा आणि कोणतेही मोठे निर्णय घेऊ नका, असा सल्ला श्रीगणेश देतात. आठवड्याच्या उत्तरार्धात किरकोळ आजाराचे प्रश्न सुटतील.
कुंभ : श्रीगणेश म्हणतात की, या आठवड्यात तुमचे पालक तुम्हाला योग्य सहकार्य करतील. नोकरीत समाधानकारक स्थिती असेल. मालमत्ता आणि जमिनीशी संबंधित बाबींमध्ये फायदा होईल. विद्यार्थी प्रगती करतील. स्वाभिमान वाढवा तुम्ही तुमचे लक्ष्य साध्य कराल. आठवड्याच्या शेवटी सहलीचे नियोजन कराल; परंतु दूरच्या ठिकाणी जाणे टाळा. आठवड्याच्या उत्तरार्धात मंगळाचा अशुभ प्रभाव पडेल. आरोग्य चांगले राहील.
मीन: श्रीगणेश सांगतात की, या आठवड्यात तुम्ही घरगुती कामात व्यस्त असाल. कुटुंबाबरोबर वेळ व्यतित कराल. तुमचे सहकारीही तुम्हाला चांगली बातमी देतील. विवाहित नवीन घर किंवा नवीन मालमत्ता शोधतील. जोडीदाराबरोबर मतभेदाची शक्यता. समस्या सोडवल्याने आठवड्याच्या शेवटी गोष्टी चांगल्या होतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका. तुमच्या निष्काळजीपणामुळे तुम्हाला पोटाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागेल.
Latest Marathi News Weekly Horoscope | साप्ताहिक राशीभविष्य १ ते ७ एप्रिल २०२४ Brought to You By : Bharat Live News Media.