राजौरीत सुरक्षा दलाला मोठे यश, पाकिस्‍तानी दहशतवाद्याचा खात्‍मा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :पुढारी ऑनलाईन डेस्‍क : जम्मू -काश्‍मीरमधील राजौरी जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही चकमक सुरूच आहे. या कारवाईत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. चकमकीत पाकिस्तानी दहशतवादी क्वारी मारला गेला आहे. त्याला पाक आणि अफगाण आघाडीवर प्रशिक्षण देण्यात आले होते. क्वारी हा लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा कमांडर होता. दहशतवादी क्‍वारी गेल्या एक वर्षापासून राजोरी आणि … The post राजौरीत सुरक्षा दलाला मोठे यश, पाकिस्‍तानी दहशतवाद्याचा खात्‍मा appeared first on पुढारी.
#image_title

राजौरीत सुरक्षा दलाला मोठे यश, पाकिस्‍तानी दहशतवाद्याचा खात्‍मा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :पुढारी ऑनलाईन डेस्‍क : जम्मू -काश्‍मीरमधील राजौरी जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही चकमक सुरूच आहे. या कारवाईत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. चकमकीत पाकिस्तानी दहशतवादी क्वारी मारला गेला आहे. त्याला पाक आणि अफगाण आघाडीवर प्रशिक्षण देण्यात आले होते. क्वारी हा लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा कमांडर होता.
दहशतवादी क्‍वारी गेल्या एक वर्षापासून राजोरी आणि पूंछमध्ये सक्रिय होता. तो कंदी हल्ल्याचा मास्टरमाईंडही होता. या भागात दहशतवादाला खतपणाी घालण्‍याचे काम तो करत होता. तरुणांना प्रशिक्षण देण्याचे काम तो करत असे. या वर्षी राजौरीत झालेल्‍या दहशतवादी हल्‍ल्‍यात सात नागरिक ठार झाले होते. या हल्‍ल्‍यामागेही त्‍याचाच हात होता, असे भारतीय सैन्‍यदलाच्‍या जनसंपर्क अधिकार्‍यांनी सांगितले.
राजौरीत बुधवारी (दि.२२) नागरिकांना वाचवत असताना सुरक्षा दलांवर दहशतवाद्यांनी अचानक हल्ला केला. दोन अधिकारी आणि दोन जवानांसह चार जण शहीद झाले होते. कॅप्टन एमव्ही प्रांजल, कॅप्टन शुभम, हवालदार मजीद अशी बलिदान दिलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. शहीद झालेल्‍या एका जवानांची ओळख पटली नव्‍हती. ९ पॅरा येथील मेजर मेहरा यांच्या हाताला आणि छातीला दुखापत झाली आहे. त्यांना विमानाने उधमपूर येथील कमांड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. येथे त्यांची प्रकृती स्थिर आहे. जखमी जवानावर राजौरी येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. बुधवारी सकाळी सुरू झालेली चकमक सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू होती. अंधारामुळे नऊ तासांनंतर गोळीबार थांबवण्यात आला सुरक्षा दलांनी दोन्ही दहशतवाद्यांना घेरले.
रविवारी संध्याकाळी उशिरा या भागात दोन दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफचे जवान चार दिवसांपासून शोध मोहीम राबवत होते. रविवारी संध्याकाळी सुरक्षा दलांना माहिती मिळाली होती की बंदुकांसह दोन संशयित लोक ब्रेवी भागातील एका घरात घुसले आणि रात्रीचे जेवण करून पळून गेले. यानंतर मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू करण्यात आली. या कारवाईत स्निफर डॉग्जशिवाय ड्रोनच्या सहाय्यानेही शोध घेण्यात येत होता. दहशतवाद्यांच्या शोधात सीआरपीएफने आपले कोब्रा कमांडोही तैनात केले होते.
बुधवारी सकाळी सुरक्षा दलांना या भागात घुसलेले दहशतवादी सापडले आणि त्यानंतर दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला जो संध्याकाळी ७ वाजता थांबला. वेढलेल्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी अतिरिक्त लष्करी दलाला पाचारण करण्यात आल्याचे लष्करी सूत्रांनी सांगितले.

J&K | Rajouri encounter: One terrorist named Quari has been killed in an ongoing operation. The individual is a Pak National. He has been trained on the Pak & Afghan Front. He is a highly-ranked terrorist leader of Lashkar-e-Taiba. He has been active in Rajouri-Poonch along with…
— ANI (@ANI) November 23, 2023

हेही वाचा 

Rajouri Encounter : जम्‍मू-काश्‍मीरमधील राजौरीत चकमक सुरुच, जवानांचा परिसराला वेढा
Maharashtra Politics: साहेब, ‘व्यथा समजण्यासाठी केवळ सोन्याचा…’ रोहित पवार यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
Uttarkashi Tunnel rescue : बचाव कार्याचा शेवटचा टप्पा थांबला; ऑगर मशीनमध्ये बिघाड, दिल्लीहून तज्ज्ञ दाखल

The post राजौरीत सुरक्षा दलाला मोठे यश, पाकिस्‍तानी दहशतवाद्याचा खात्‍मा appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :पुढारी ऑनलाईन डेस्‍क : जम्मू -काश्‍मीरमधील राजौरी जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही चकमक सुरूच आहे. या कारवाईत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. चकमकीत पाकिस्तानी दहशतवादी क्वारी मारला गेला आहे. त्याला पाक आणि अफगाण आघाडीवर प्रशिक्षण देण्यात आले होते. क्वारी हा लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा कमांडर होता. दहशतवादी क्‍वारी गेल्या एक वर्षापासून राजोरी आणि …

The post राजौरीत सुरक्षा दलाला मोठे यश, पाकिस्‍तानी दहशतवाद्याचा खात्‍मा appeared first on पुढारी.

Go to Source