ब्रिटनच्या राजकुमाराचे अफेअर समोर आल्याने खळबळ
लंडन : ब्रिटनच्या राजघराण्याचे राजकुमार प्रिन्स विलियम आणि त्यांची पत्नी केट मिडलटन सध्या चर्चेत आहेत. मिडलटन आजारपणामुळे चर्चेत होत्या, पण आता त्यांचे पती विलियम यांचे अफेअर समोर आल्याने खळबळ उडाली आहे. त्यांचे अफेअर केट यांचीच जवळची मैत्रीण रोज हेनबरीसोबत असल्याची चर्चा आहे.
हेनबरी यांचा राजघराण्याशी जवळचा संबंध आहे. त्या केट मिडलटन यांच्या सर्वात जवळच्या मैत्रिणींपैकी एक आहेत. त्या डेविड चोलमोंडेली यांच्या पत्नी आहेत. प्रिन्स आणि हेनबरी यांच्या अफेअरची चर्चा पहिल्यांदाच समोर आली असे नव्हे, 2019 मध्येही दोघांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा झाली होती. त्यावेळी प्रिन्स विलियमने हेनबरीसोबत व्हॅलेंटाइन डे साजरा केल्याचे सांगण्यात आले होते. प्रिन्सच्या अफेअरच्या चर्चांमुळे केंसिंग्टन पॅलेसने निवेदन जाहीर केले असून, त्यात केट यांच्या प्रकृतीची माहिती दिली आहे. केट पोटाच्या शस्त्रक्रियेतून बरी होत असून, सध्या आराम करत आहे. बाहेर पडण्याच्या स्थितीत नाही.
केट मिडलटन आणि प्रिन्स विलियम यांचे लग्न 2011 मध्ये झाले होते. त्यांना प्रिन्स जॉर्ज, प्रिन्सेस चार्लोट आणि प्रिन्स लुइस ही तीन मुले आहेत. हे कुटुंब केंसिंग्टन पॅलेसमध्ये राहते. गेल्या वर्षी रोज हेनबरी यांनी किंग चार्ल्सच्या राज्याभिषेक सोहळ्यात भाग घेतला होता, मात्र केटसोबत त्यांचे एकही छायाचित्र समोर आले नव्हते. सध्या केट आणि हेनबरी यांच्यात मैत्री नाही. हेनबरी पतीसोबत नॉरफॉक शहरात राहतात. त्यांनाही तीन मुले आहेत.
कोण आहे रोज हेनबरी
रोज हेनबरी यांचा जन्म 1984 मध्ये झाला होता. त्या केटपेक्षा दोन वर्षांनी लहान आहेत. लग्नापूर्वी त्या प्रसिद्ध मॉडेल होती. कंंजरवेटिव पक्षाचे खासदार मायकल गोव यांच्या राजकीय विश्लेषक म्हणून त्या कार्यरत होत्या. त्यासुद्धा प्रसिद्ध कुटुंबातून आहेत. तिच्या कुटुंबीयांचे राजघराण्याशी जुने आणि घनिष्ठ संबंध राहिलेले आहेत. प्रिन्स विलियम आणि केट मिडलटन यांचे लग्न एप्रिल 2011 मध्ये झाले होते.
Latest Marathi News ब्रिटनच्या राजकुमाराचे अफेअर समोर आल्याने खळबळ Brought to You By : Bharat Live News Media.