पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यास १५ वर्ष झाल्यानिमित्त इस्रायलने ( Israel ) पाकिस्तानमधील लष्कर-ए-तोयबा ( Lashkar-e-Taiba ) या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केले आहे. इस्रायलने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, “मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या पंधराव्या वर्षाच्या स्मृतीदिनाचे प्रतीक म्हणून इस्रायल राज्याने लष्कर-ए-तैयबाला दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केले आहे. विशेष म्हणजे भारत सरकारने यासंदर्भात कोणतीही विनंती केली नसतानाही इस्रायलने औपचारिकपणे सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत.
Lashkar-e-Taiba शेकडो भारतीय नागरिकांच्या हत्येसाठी जबाबदार
“लष्कर-ए-तैयबा ही एक घातक दहशतवादी संघटना आहे, जी शेकडो भारतीय नागरिकांच्या तसेच इतरांच्या हत्येसाठी जबाबदार आहे. 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेली त्याची घृणास्पद कृत्ये अजूनही सर्व शांतता शोधणार्या राष्ट्रांमध्ये आणि समाजांतून जोरात सुरू आहेत,” असेही इस्त्रायलने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
इस्रायल राज्य दहशतवादाला बळी पडलेल्या आणि मुंबई हल्ल्यातील वाचलेल्या आणि शोकग्रस्त कुटुंबांप्रती प्रामाणिक शोक व्यक्त करतो, ज्यात इस्रायलमधील लोकांचाही समावेश आहे. चांगल्या आणि शांततापूर्ण भविष्याच्या आशेने आम्ही तुमच्यासोबत एकजुटीने उभे आहोत,” असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
Israel bans Lashkar-e-Taiba, says “Organisation responsible for murder of Indians”
Read @ANI Story | https://t.co/MscSFiS2ub#Israel #India #LeT #LeTBan pic.twitter.com/U3iAkI8UU5
— ANI Digital (@ani_digital) November 21, 2023
विशेष म्हणजे भारत सरकारने यासंदर्भात कोणतीही विनंती केली नसतानाही इस्रायलने औपचारिकपणे सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. इस्रायलने दहशतवादी संघटनांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये देशातंर्गत व देशा बाहेरील दहशतवादी संघटनांसा समावेश आहे. दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी एकत्रित जागतिक आघाडीचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी, ही यादी जाहीर करण्यात आली आहे.
२६ नोव्हेंबर २०११ रोजी मुंबई दहशतवादी हल्ला झाला होता. लष्कर-ए-तोयबा या पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनेने हा हल्ला केला. या संघटनेच्या १० दहशतवाद्यांनी मुंबईला चार दिवस वेठीस धरले. नऊ हल्लेखोरांसह १७५ लोक मरण पावले आणि 300 हून अधिक जखमी झाले होते.
गेली ४६ दिवस इस्त्रायल-हमास युद्ध सुरु आहे. पॅलेस्टाईनमधील दहशतवादी हमासने ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर भीषण हल्ला केला. यामध्ये १,२०० हून अधिक इस्त्रायली नागरिकांचा मृत्यू झाला होता. दहशतवाद्यांनी सुमारे २४० नागरिकांना ओलीस ठेवले होते. इस्रायलने केलेल्या प्रत्युत्तरात आतापर्यंत गाझामध्ये 5,000 पेक्षा जास्त अल्पवयीन आणि 3,250 महिलांसह 12,700 हून अधिक पॅलेस्टिनी ठार झाले आहेत.
The post इस्रायलचा माेठा निर्णय : दहशतवादी संघटनेच्या यादीत ‘लष्कर-ए-तोयबा’ appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यास १५ वर्ष झाल्यानिमित्त इस्रायलने ( Israel ) पाकिस्तानमधील लष्कर-ए-तोयबा ( Lashkar-e-Taiba ) या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केले आहे. इस्रायलने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, “मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या पंधराव्या वर्षाच्या स्मृतीदिनाचे प्रतीक म्हणून इस्रायल राज्याने लष्कर-ए-तैयबाला दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केले आहे. विशेष म्हणजे भारत सरकारने …
The post इस्रायलचा माेठा निर्णय : दहशतवादी संघटनेच्या यादीत ‘लष्कर-ए-तोयबा’ appeared first on पुढारी.