कोल्हापूर : सरवडे येथे अवैध लाकूड वाहतुकीवर वनविभागाची कारवाई
सरवडे; Bharat Live News Media वृत्तसेवा : राधानगरी तालुक्यातील सरवडे इथं शुक्रवारी सायंकाळी सातच्या दरम्यान वनपरिक्षेत्र हद्दीत जाळ रेषा काढून येत असताना जळाऊ लाकूड वाहतूक करणारा ट्रॅक्टर ट्रॉली निदर्शनास आली.चालकास पासची विचारना केली असता चालकाने लाकूड डंपिंग करून टॅक्टर ट्रॉलीसह पळ काढला होता.वनाधिकार्यांनी आज ट्रकटरट्रॉलीचा शोध घेऊन जळाऊ लाकडासह ट्रक्टर ट्रॉली जप्त केलीय.
सरवडे वनपरिक्षेत्रात जाळरेषा घेऊन वनाधिकारी आणि कर्मचारी सरवडे गावात येत असताना शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान कुंभार माळ इथं आल्यानंतर ट्रॅक्टरट्रॉलीमध्ये जळाऊ लाकूड वाहतूक करताना आढळले. मालाच्या वाहतुक कामी पास परवान्याचाबत विचारणा केली असता ट्रॅक्टर चालकाणे उडवीची उत्तरे दिली. आणि चालकाणे ट्रॉलीलील माल शिवाजी मारुती कुंभार यांच्या दारात बळजबरीने डंपीग करून ट्रैक्टर ट्रॉलीसह पळून गेला होता.
आज वनविभागाने संबंधित ट्रॅकटरट्रॉलीसह लाकूड जप्त केलंय.राधानगरी तालुक्यातील बनाचीवाडी इथल्या केरबा राजाराम काशीद यांच्या मालकीचा ट्रॅक्टरट्रॉली आहे.या कारवाईत ट्रॅकटरट्रॉलीसह चार घनमीटर जळाऊ लाकूड वनविभागाने जप्त केले आहे..अधिक तपास सरवडे वनपरिक्षेत्राचे वनपाल एस बी भाट करत आहेत.या कारवाईत राधानगरीचे वनक्षेत्रपाल विशाल पाटील, महादेव अंगज,एस. बी. भाट, एम. डी. जांगजनक, जितेंद्र सापळे, ए. एस. संकपाळ, श्रीमती एस. ए. पाटील,सरदार चुयेकर यांनी सहभाग घेतला होता.
Latest Marathi News कोल्हापूर : सरवडे येथे अवैध लाकूड वाहतुकीवर वनविभागाची कारवाई Brought to You By : Bharat Live News Media.