भाजपचे दोनदिवसीय राष्ट्रीय अधिवेशन सुरू

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीपूर्वी नेते आणि कार्यकर्त्यांना सज्ज करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे दोनदिवसीय राष्ट्रीय अधिवेशन (BJP National Council 2024) आजपासून (दि. १७) दिल्लीत सुरू झाले आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत मंडपम येथील प्रदर्शनाला भेट दिली. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या ३७० जागा, तर एनडीएच्या ४०० जागा जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पक्ष … The post भाजपचे दोनदिवसीय राष्ट्रीय अधिवेशन सुरू appeared first on पुढारी.

भाजपचे दोनदिवसीय राष्ट्रीय अधिवेशन सुरू

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीपूर्वी नेते आणि कार्यकर्त्यांना सज्ज करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे दोनदिवसीय राष्ट्रीय अधिवेशन (BJP National Council 2024) आजपासून (दि. १७) दिल्लीत सुरू झाले आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत मंडपम येथील प्रदर्शनाला भेट दिली. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या ३७० जागा, तर एनडीएच्या ४०० जागा जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पक्ष कार्यकर्त्यांना विजयाचा मंत्र देणार आहेत. रविवारी अधिवेशनाचा समारोप होणार आहे.

PM Shri @narendramodi arrives for BJP National Office Bearers meeting at Bharat Mandapam. #BJPNationalCouncil2024 https://t.co/0q6bRQDmIy
— BJP (@BJP4India) February 17, 2024

प्रगती मैदान भागातील भारत मंडपममध्ये होणाऱ्या अधिवेशनासाठी (BJP National Council 2024) सर्व राष्ट्रीय आणि राज्यांमधील पदाधिकारी दिल्लीत पोहोचले आहेत. केंद्रीय गृह मंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासह इतर वरिष्ठ नेते पोहोचले आहेत. लोकसभा निवडणुकीची केव्हाही घोषणा होऊ शकते भाजपने या निवडणुकीसाठी ३७० जागांचे तर एनडीए आघाडीसाठी ४०० जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे. त्या पार्श्वभूमीवर या अधिवेशनाच्या माध्यमातून निवडणुकीच्या तयारीवर चर्चा करण्यात येणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर होणाऱ्या या राष्ट्रीय अधिवेशनाची तयारी पूर्ण झाली असून यानिमित्ताने संघटनात्मक शक्तिप्रदर्शन करण्याचा भाजपचा प्रयत्न राहील. पंतप्रधान मोदी आणि पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा पदाधिकाऱ्यांना विजयाचा मंत्र देणार आहेत. अधिवेशनाची सुरुवात पक्षाध्यक्ष नड्डा यांच्या भाषणाने होणार असून पंतप्रधान मोदींच्या संबोधनाने अधिवेशनाचा समारोप होईल. (BJP National Council 2024)
BJP National Council 2024 : आराखडा तयार
निर्धारित वेळेत प्रत्येक बूथपर्यंत ताकद पोहोचविण्याचे उद्दिष्ट भाजपने ठरविले असून मतदारांना साद घालण्यासाठी कोणते मुद्दे हाती घ्यावे याचा आराखडा पक्षनेतृत्वाने तयार केला आहे. हा आराखडा अधिवेशनात मांडला जाणार असल्याचे समजते. राम मंदिर उभारणी आणि भाजप सरकारच्या गेल्या दह वर्षांतील लोककल्याणकारी योजनांच जास्तीत जास्त प्रचार करण्याची आखण पक्षाने केली आहे. यासोबतच संलग्न संघटनांनाही जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. (BJP National Council 2024)
हेही वाचा : 

भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात पंतप्रधान मोदी देणार विजयाचा मंत्र
‘आयकर’ने काँग्रेसची बँक खाती का गोठवली? जाणून घ्या प्रकरण
भारत जोडो न्याय यात्रेत प्रियंका गांधी सहभागी होणार नाहीत

Latest Marathi News भाजपचे दोनदिवसीय राष्ट्रीय अधिवेशन सुरू Brought to You By : Bharat Live News Media.