हवामान उपग्रहाच्या प्रक्षेपणापूर्वी इस्रो प्रमुखांची मंदिरात प्रार्थना

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आज हवामान उपग्रह INSAT-3DS प्रक्षेपित करणार आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून संध्याकाळी ५:३५ वाजता हे प्रक्षेपण केले जाईल. तत्पूर्वी इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी आज सकाळी आंध्र प्रदेशातील सुल्लुरपेट येथील श्री चेंगलम्मा मंदिरात प्रार्थना केली.
भारतीय अंतराळ संशोधन केंद्राने (इस्रो) यावर्षातील दुसरी महत्त्वाची मोहिम हाती घेतली आहे. हवामानशास्त्रीय उपग्रहाचे प्रक्षेपण GSLV F14 सॅटेलाईटद्वारे केले जाईल. इनसॅट-३डीएस उपग्रह प्रक्षेपित करण्यामागे हवामान आणि नैसर्गिक आपत्तींची अचूक माहिती मिळणे हा आहे.
इस्रोच्या INSAT-3DS या हवामानविषयक उपग्रहाने बंगळूरमधील यूआर राव उपग्रह केंद्रात उपग्रह संयोजन, एकत्रीकरण आणि उपक्रम चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. तसेच पुढे ISRO ने X वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, GSLV’sच्या या १६ व्या मोहिमेत लक्ष्य निर्धारित केले आहे. इनसॅट-3डी हा उपग्रह हवामानशास्त्र आणि आपत्ती चेतावणीशी संबंधित आहे. या मोहिमेला संपूर्णपणे पृथ्वी विज्ञान मंत्रालयाकडून निधी दिला जाणार असल्याचे देखील इस्रोने स्पष्ट केले आहे.
इनसॅट 3DS हा एक अद्वितीय हवामानशास्त्रीय उपग्रह आहे. ज्याचा प्राथमिक उद्देश सध्याच्या कक्षेत असलेल्या इनसॅट-3डी आणि 3डीआर उपग्रहांना सेवांची सातत्यता प्रदान करणे. इन्सॅट प्रणालीच्या क्षमतांमध्ये लक्षणीय वाढ करणे आहे. इस्रोचा हा उपग्रह पृथ्वी विज्ञान मंत्रालयसह (MoES) युजर्स अनुदानित प्रकल्प आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पेस एजन्सी फेब्रुवारीच्या मध्यात प्रक्षेपण करण्याचे लक्ष्य ठेवत आहे.
#WATCH | ISRO Chairman S Somnath offered prayers at
at Sri Chengalamma Temple in Sullurpet of Andhra Pradesh today, ahead of meteorological satellite INSAT-3DS launch from Sriharikota pic.twitter.com/0KVd8gRvi7
— ANI (@ANI) February 17, 2024
हेही वाचा :
हवामान उपग्रहासाठी ISRO सज्ज; INSAT-3DS चे उद्या प्रक्षेपण
८४ हजार ५६० कोटींच्या संरक्षण कराराला मंजूरी
Latest Marathi News हवामान उपग्रहाच्या प्रक्षेपणापूर्वी इस्रो प्रमुखांची मंदिरात प्रार्थना Brought to You By : Bharat Live News Media.
