नांदेड : मराठा आंदोलन पेटले; आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या वाहनाची तोडफोड

नवीन नांदेड ; Bharat Live News Media वृत्तसेवा काल (शुक्रवार) रोजी रात्री उशिरा नांदेड दक्षिणचे आमदार मोहनराव हंबर्डे हे पिंपळगाव निमजी (ता. जि. नांदेड) येथे कीर्तन कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी वाहनावर दगडफेक करून काचा फोडल्याची घटना घडली. या हल्ल्यात आमदार मोहनराव हंबर्डे बचावले, मात्र त्यांच्या वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.
सप्ताहाच्या कीर्तनासाठी आ. हंबर्डे हे पिंपळगाव निमजी येथे आले होते. सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी गावात प्रवेश बंदी असल्याची सूचना देऊन आमदारांना गावात येण्यास मनाई केली होती. मात्र, आमदारांनी हट्ट धरल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी आमदार यांच्या वाहनावर दगडफेक केली. अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. या हल्ल्यात आमदार हंबर्डे बचावले, मात्र त्यांच्या वाहनाचे नुकसान झाले.
हेही वाचा :
Alexei Navalny | पुतिन यांचे कट्टर विरोधक नवालनी यांचा तुरुंगात मृत्यू, विषप्रयोगाचा संशय?
Shikshak Bharti 2024 : आचारसंहिता लागल्यास शिक्षक भरती लांबणार?
तलाठी बनण्याचे स्वप्न अधांतरीच : 2 हजार उमेदवारांचे भवितव्य टांगणीला
Latest Marathi News नांदेड : मराठा आंदोलन पेटले; आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या वाहनाची तोडफोड Brought to You By : Bharat Live News Media.
