चिन्ह गेल्याने फरक पडत नाही : शरद पवार

बारामती : Bharat Live News Media वृत्तसेवा : राजकारणात पक्षाचे चिन्ह गेल्याने फारशी चिंता करण्याची आवश्यकता नाही. मी आत्तापर्यंत 14 निवडणुका लढलो,पैकी पाच निवडणुका आशा होत्या की यामध्ये चिन्ह वेगळी होती. एका निवडणुकीत बैल जोडी नंतर गाई वासरू नंतर चरखा, हात आणि मग घड्याळ या वेगवेगळी चिन्हे राज्यात आणि देशात आपण पाहिलु आहेत, त्यामुळे कोणाला असं वाटत असेल की ती एकदा संघटनेचे चिन्ह आपण काढून घेतले तर त्या संघटनेचे अस्तित्व संपेल असं कधी होत नसते. असे जेष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले.
पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे आज पहिल्यांदाच बारामती आले आहेत. पवार यांच्या बारामती येथील गोविंद बाग या निवासस्थानी माढा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला यावेळी त्यांनी पक्ष आणि पक्ष चिन्ह गेल्याबाबत भाष्य केले. राजकारणामध्ये पक्ष उभे राहतात. पक्ष सोडून जातात ही प्रक्रिया चालू राहते. मात्र देशांमध्ये असं कधीच घडलं नाही की ज्यांनी पक्ष स्थापन केला त्यांचा पक्षच काढून दुसऱ्याला दिला. नुसता पक्षच दिला नाही तर चिन्ह सुद्धा दिले अशी प्रतिक्रिया ही ज शरद पवार यांनी व्यक्त केली. हा निर्णय कायद्याला धरून आहे असे वाटत नाही असेही पवार यावेळी म्हणाले. या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असल्याचे ते म्हणाले. त्याचा निकाल लवकर लागेल अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.
नवीन चिन्ह पोहोचवू
माढ्यातील पदाधिकार्याशी बोलताना पवार म्हणाले, एक गोष्ट नक्की आहे की सामान्य माणसांची संपर्क हा वाढवला पाहिजे त्यांना नवीन आपली चिन्ह सांगितले पाहिजे, त्यामुळे फारशी अडचण येणार नाही असे सांगून पवार म्हणाले, तुम्ही ज्या मतदारसंघातून काम करता त्या मतदारसंघातून मला तुम्ही निवडून दिले आहे तो मतदारसंघ मला चांगला ठाऊक आहे, तुम्ही एकजुटीने आपली शक्ती पणाला लावली तर अनुकूल अशा प्रकारचा निकाल आपण या मतदारसंघातून देऊ, येत्या काही दिवसांमध्ये माढा मतदारसंघात कोण उमेदवार द्यायचा यासंबंधीचा निर्णय होईल.
हेही वाचा
‘हे’ ठिकाण पृथ्वीवरच आहे!
Influenza Virus : राज्यात पुन्हा इन्फ्लूएंझा विषाणूचा फैलाल
शब्दांपासून व्हिडीओ बनवणारे ‘एआय सोरा’ टूल लाँच
Latest Marathi News चिन्ह गेल्याने फरक पडत नाही : शरद पवार Brought to You By : Bharat Live News Media.
