सातारा : ‘रयत क्रांती’ च्या जिल्हाध्यक्षावर खंडणीप्रकरणी गुन्हा

सातारा : ‘रयत क्रांती’ च्या जिल्हाध्यक्षावर खंडणीप्रकरणी गुन्हा

सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातारा बाजार समितीमध्ये तुमच्याविरुद्ध तक्रार आहे, असे म्हणून आम्हाला दिवाळीसाठी 50 हजार रुपये द्या, अशी खंडणी मागितल्याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्या संशयितामध्ये रयत क्रांती संघटनेचा जिल्हाध्यक्ष व आणखी एका पदाधिकार्‍याचा समावेश आहे.
संघटनेचा जिल्हाध्यक्ष मधुकर एकनाथ जाधव (रा. सदरबझार, सातारा, मूळ रा. कोरेगाव) व हणमंत बाबुराव साबळे (रा. शिवथर, ता. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहे. याप्रकरणी महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, डिसेंबर 2021 पासून संशयित मधुकर जाधव याने महिलेच्या पतीला दिवाळीसाठी वेळोवेळी 5 लाख रूपयांची मागणी केली. त्यावेळी बाजार समितीतील संबंधित व्यापार्‍याने सध्या पैसे नसल्याचे सांगितले. यामुळे संशयित चिडून होते. तसेच संबंधित व्यापार्‍याविरूध्द बाजार समितीत बोगस मालाबाबत तक्रार करू, अशी धमकी दिली. यामुळे घाबरून संबंधित व्यापार्‍याने एका संशयिताच्या पत्नीच्या फोन पेवर 10 हजार रूपये पाठवले. त्यानंतर संशयिताने काही त्रास दिला नाही. मात्र, दि. 8 रोजी पुन्हा व्यापार्‍याच्या मोबाईलवर संशयितांनी फोन करून पुन्हा त्रास देवून पैशांची मागणी करून खंडणी मागितली. त्यानंतर दि. 9 रोजी व्यापार्‍याच्या दुकानात येवून संशयितांनी गोंधळ घातला. यानंतर पुन्हा पैशाची मागणी केल्यानंतर संबंधित व्यापार्‍याने संशयितांविरूध्द खंडणीचा गुन्हा दाखल केला.
The post सातारा : ‘रयत क्रांती’ च्या जिल्हाध्यक्षावर खंडणीप्रकरणी गुन्हा appeared first on पुढारी.

सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातारा बाजार समितीमध्ये तुमच्याविरुद्ध तक्रार आहे, असे म्हणून आम्हाला दिवाळीसाठी 50 हजार रुपये द्या, अशी खंडणी मागितल्याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्या संशयितामध्ये रयत क्रांती संघटनेचा जिल्हाध्यक्ष व आणखी एका पदाधिकार्‍याचा समावेश आहे. संघटनेचा जिल्हाध्यक्ष मधुकर एकनाथ जाधव (रा. सदरबझार, सातारा, मूळ रा. कोरेगाव) …

The post सातारा : ‘रयत क्रांती’ च्या जिल्हाध्यक्षावर खंडणीप्रकरणी गुन्हा appeared first on पुढारी.

Go to Source