उल्हासनगर गोळीबार प्रकरण, जखमी महेश गायकवाडांची मुख्‍यमंत्री शिंदेंनी घेतली भेट

पुढारी ऑनलाईन डेस्क : ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये जमिनीच्या वादातून भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शुक्रवारी रात्री पोलीस ठाण्यात गोळीबार केला होता. ठाण्याच्या जुपिटर रुग्णालयात त्‍यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. आज (दि.३) सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची चाैकशी केली. श्रीकांत शिंदेही उपस्‍थित होते. माध्‍यमांशी … The post उल्हासनगर गोळीबार प्रकरण, जखमी महेश गायकवाडांची मुख्‍यमंत्री शिंदेंनी घेतली भेट appeared first on पुढारी.

उल्हासनगर गोळीबार प्रकरण, जखमी महेश गायकवाडांची मुख्‍यमंत्री शिंदेंनी घेतली भेट

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये जमिनीच्या वादातून भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शुक्रवारी रात्री पोलीस ठाण्यात गोळीबार केला होता. ठाण्याच्या जुपिटर रुग्णालयात त्‍यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. आज (दि.३) सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची चाैकशी केली. श्रीकांत शिंदेही उपस्‍थित होते.
माध्‍यमांशी बाेलताना श्रीकांत शिंदे म्‍हणाले की, “पाेलीस ठाण्‍यात झालेल्‍या गाेळीबाराच्‍या घटना ही सीसीटीव्‍हीमध्‍ये कैद झाली आहे. त्‍यामुळे या प्रकरणी काेण या बाेलतय यापेक्षा पुरावे काय सांगतायत हे महत्त्‍वाचे आहे.”
ठाणे जिल्ह्यातील उल्हास नगरमध्ये जमिनीच्या वादातून भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शुक्रवारी रात्री पोलीस ठाण्यात गोळीबार केला होता. या गोळीबारात कल्याण शिवसेनेचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांना ५ गोळ्या लागल्या, तर राहुल पाटील यांना एक गोळी लागली. या दोन्ही जखमीना उल्हासनगरच्या मीरा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना ठाण्याच्या जुपिटर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सकाळी पहाटे महेश गायकवाड यांच्यावर शस्त्रक्रिया करून ५ गोळ्या त्यांच्या शरीरातून काढण्यात आल्या आहेत.
महेश गायकवाड यांच्‍यावर शस्त्रक्रिया झाली असून सध्‍या त्‍यांना अति दक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहेत्यांची प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. या टीममध्ये इंटेन्सिव्हिस्ट, जनरल सर्जन आणि थोरॅसिक आणि ऑर्थोपेडिक सर्जन यांचा समावेश आहे.
हेही वाचा

BJP Bawankule : उल्हासनगर गोळीबार प्रकरणातील दोषींवर कारवाई होणार; भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 
उल्हासनगर येथील गोळीबार प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया
Who is Ganpat Gaikwad? | शिंदे गटाच्या नेत्यावर गोळ्या झाडणारे भाजप आमदार गणपत गायकवाड कोण आहेत?

Latest Marathi News उल्हासनगर गोळीबार प्रकरण, जखमी महेश गायकवाडांची मुख्‍यमंत्री शिंदेंनी घेतली भेट Brought to You By : Bharat Live News Media.