सर्वसामान्यांना आणखी एक धक्का?
बस तिकीट दरवाढीचे संकेत : केएसआरटीसीचा सरकारला प्रस्ताव
प्रतिनिधी/ बेंगळूर
महागाईमुळे आधीच हैराण झालेल्या राज्यातील जनतेला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाने (केएसआरटीसी) बस तिकीट दरवाढीसंबंधी राज्य सरकारला प्रस्ताव सादर केला आहे. त्यामुळे लवकरच बस तिकीट दरात 10 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
परिवहन मंत्री रामलिंगारेड्डी यांनी शनिवारी याविषयी माहिती दिली आहे. केएसआरटीसीने राज्य सरकारकडे तिकीट दरवाढीचा प्रस्ताव सादर केला आहे. 14 जुलै रोजीच हा प्रस्ताव सादर करण्यात आला असून 15 ते 20 टक्के तिकीट दरवाढ करण्याची मागणी केली आहे. या प्रस्तावाविषयी आपण अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे रामलिंगारेड्डी यांनी सांगितले आहे.
प्रस्तावाची बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणण्यात आल्याचे समजते. या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली आहे. त्यामुळे ते तिकीट दरवाढीविषयी लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन, डिझेल, बसच्या सुट्या भागांच्या किमतीत वाढ आदी कारणांमुळे परिवहन संस्थेला मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागत आहे. त्यामुळे केएसआरटीसीच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी तिकीट दरवाढीची मागणी करण्यात आली आहे.
Home महत्वाची बातमी सर्वसामान्यांना आणखी एक धक्का?
सर्वसामान्यांना आणखी एक धक्का?
बस तिकीट दरवाढीचे संकेत : केएसआरटीसीचा सरकारला प्रस्ताव प्रतिनिधी/ बेंगळूर महागाईमुळे आधीच हैराण झालेल्या राज्यातील जनतेला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाने (केएसआरटीसी) बस तिकीट दरवाढीसंबंधी राज्य सरकारला प्रस्ताव सादर केला आहे. त्यामुळे लवकरच बस तिकीट दरात 10 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. परिवहन मंत्री रामलिंगारेड्डी यांनी शनिवारी याविषयी […]