शुक्रवारी आणखी एक अर्ज म.ए.समितीकडे दाखल

बेळगाव : लोकसभा निवडणुकीसाठी म. ए. समितीने इच्छुकांकडून अर्ज दाखल करण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत शुक्रवार दि. 5 रोजी महादेव पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे. यापूर्वी साधना पाटील यांनी अर्ज दाखल केला होता. दुसरा अर्ज दाखल झाला असून शनिवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. लोकसभा निवडणूक 7 मे रोजी होत […]

शुक्रवारी आणखी एक अर्ज म.ए.समितीकडे दाखल

बेळगाव : लोकसभा निवडणुकीसाठी म. ए. समितीने इच्छुकांकडून अर्ज दाखल करण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत शुक्रवार दि. 5 रोजी महादेव पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे. यापूर्वी साधना पाटील यांनी अर्ज दाखल केला होता. दुसरा अर्ज दाखल झाला असून शनिवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. लोकसभा निवडणूक 7 मे रोजी होत आहे. ती निवडणूक लढविण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. म. ए. समितीने इच्छुकांकडून अर्ज मागविले आहेत. आतापर्यंत दोन अर्ज दाखल झाले आहेत. तर शेवटच्या दिवशी आणखी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. अर्ज दाखल झाल्यानंतर एका उमेदवाराची निवड केली जाणार आहे. मदन बामणे, अंकुश केसरकर, श्रीकांत कदम यांनी शुक्रवारी महादेव पाटील यांनी अर्ज स्वीकारला आहे. यावेळी रणजीत चव्हाण-पाटील, रामचंद्र मोदगेकर, दत्ता जाधव, सागर पाटील, रणजीत हावळण्णाचे, प्रशांत भातकांडे, मोतेश बारदेशकर, साधना पाटील, ज्ञानेश्वर मण्णूरकर, श्रीधर जाधव यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.