नाशिकच्या उद्योजकांना शारजात विस्ताराची संधी; आज बैठक
नाशिकमधील उद्योजकांना जागतिक पातळीवर व्यवसाय विस्तारासाठी शारजाह सरकारच्या अधिकाऱ्यांसमवेत ‘बी २ बी’ बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम निशुल्क असून पूर्व नोंदणी आवश्यक आहे. या बैठकीत नाशिकमधील उद्योजकांना युरोप, आफ्रिका आणि मध्य आशियामध्ये विस्तारासाठी आवश्यक सहकार्य दिले जाणार आहे.