अमृता फडणवीसांचा ‘झुमका गिरा’ व्हिडीओ व्हायरल
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या गायिका आहे आणि त्या नेहमी सोशलमिडीयावर एक्टिव असून पोस्ट शेअर करतात. अलीकडील त्यांनी वॉट झुमका या गाण्यावर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांच्या या व्हिडीओ मध्ये त्यांनी दिलेल्या कॅप्शन मुळे अनेकांचे लक्ष वेधले आहे.
त्यांनी रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटातील वॉट झुमका या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली असून हे गाणं खूप व्हायरल झाले आहे. झुमका गिरा रे या गाण्याचं हे नवीन व्हर्जन आहे. सोशलमिडीयावर हे गाणं खूपच ट्रेंड झालं या गान्यावर नेटकऱ्यानी रील बनवून शेअर केले.
अमृता फडणवीस यांनी देखील या गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ शेअर केला असून त्यांनी या व्हिडिओला ट्रॅफिक जॅम मध्ये करमणूक ,#वॉट झुमका “असे कॅप्शन दिले आहे. त्यांच्या या व्हिडिओला नेटकऱ्यानी चांगलीच पसंती दिली आहे. नेटकऱ्यानी त्यांच्या या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्स दिले आहे.
Edited by – Priya Dixit