मुंबई : धनवीरसिंग ठाकूर , आपण आपल्या दगदगीच्या धावपळीच्या आयुष्यातून काही वेळ स्वतः ला देण्या साठी एखाद निसर्गरम्य ठिकाणी काही दिवस घालवून मानसिक अनुभूती घेत असतो. आज आपल्या राज्यातीलच एक लुप्त निसर्गरम्य गावाची वर्चुअल सहल करूया…
स्वित्झर्लंड आपल्या निसर्ग सुंदरते साठी विश्व प्रसिद्ध आहे. त्या समानच एक छोटेसे गाव आपल्या महाराष्ट्रात देखील आहे. ज्याचे नाव फोफसंडी आहे. हे गाव अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आहे. अनेक वर्षांच्या दुर्लक्शित शासन व्यवस्थे मुळेच कदाचित ह्या गावातील विकास तसेच प्रचिती निसर्ग सुंदरता जरी जनसामान्यांच्या पर्यंत पोहोचली नसली तरीही काही क्वचित पर्यटक आणि ज्यांना माहित आहे. किव्हा ज्यांनी कोणी सुचविले त्यांच्या म्हणण्यावर ज्यांनी ज्यांनी ह्या गावाला भेट दिली त्यांची मात्र प्रतिक्रिया शब्दात मांडण्या ईतकी सोपी नसल्याचे आम्हाला जाणवत आहे.
फोफसंडी नेमकं नाव कसे पडले ?
खूप वर्षांच्या आधी ब्रिटिश राजवटीतील एक मातब्बर इंग्रज अधिकारी ज्यांचे नाव “फोफ” होते. त्यांनी ह्या गावाला आपली आवडती जागा म्हणून दर सुट्टीला तसेच रविवारी ठाम येथेच ठाण मांडून राहत असल्यामुळे. संडे होम असलेल्या फोफ च्या नावा पुढेच संडे आणि काही कालांतराने सँडी म्हणून प्रचिती झाली. येथील रहिवासी अत्यल्प संख्येत असून पाहिजे तेवढा विकास , रस्ते , मूलभूत सुविधा , पाणी , वीज येथे आजही दुर्मिळ आहे. आदिवासी बहुल भाग असल्यामुळे दुर्मिळ अश्या ह्या गावातील नयनरम्य सुंदरता मात्र येथील अभावात असलेल्या सुविधांना देखील मागे टाकतात.
फोफसंडी गावातील काही रोचक तथ्ये ?
फोफसंडी गावाची लोकसंख्या जवळपास १२०० असून अत्यल्प लोकसंख्या असलेल्या ह्या गावात प्रामुख्याने, बारा वाड्या व बारा आडनावाचे लोक इथे राहतात. गावात बारा वाड्या असून वळे, पिचड, कोंडार, भगत, पिचड, तातले, गोरे, उंबरे, गवारी, मेमाणे, भांगरे व भद्रिके अशी आडनावाची लोक इथे राहतात. या गावातील मुख्य व्यवसाय म्हणजे नैसर्गिक ऋतू आधारित शेतीआहे . फक्त पावसाळ्याच्या चार महिन्यात शेतीत उगवेल ते कमवून आठ महिने मोल मजुरी रोजदांरीसाठी पुणे किंवा ठाणे जिल्ह्यात जातात. गावात मुख्यतः भात, नागली, वरई पिके घेतली जातात.
फोफसंडी गावात अजूनही जुन्या काळातील ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या गेस्ट हाउसचे अवशेष शिल्लक आहेत. या गावाला निसर्गाने भरभरून दिले आहे. नदी, धबधबा, हिरवाई, डोंगर असल्याने गर्द हिरवी वनराई, दुर्मिळ पशु-पक्षी, जैववैविध्य या गावात सहजच आढळते.
निसर्गाने या गावावर मुक्तहस्ताने उधळण केली आहे. मात्र मूलभूत मानवी गरजा सोयी, रस्ता, पाणी, वीज यासारख्या भौतिक गरजा अजूनही प्रत्येकाला मिळाल्या नाहीयेत. स्थानिक शेतीला यंत्र संचालित पाणी पुरवठा सुविधा नसल्याने इतर पिके घेता येत नाहीत. मांडवी नदीचा उगम फोफसंडी गावाच्या हद्दीतच होतो. इथल्या एका गुहेत मांडव्य ऋषींनी तपश्चर्या केली होती. त्यांच्या नावावरूनच या नदीचे नाव मांडवी पडले आहे. पावसाळ्यात या गावात तुफान पाऊस पडतो. फोफसंडीचा धबधबा खूप लोकप्रिय आहे.
फोफसंडी गावात सूर्योदय दोन ते अडीच तास उशीरा होतो तसेच सूर्यास्त दोन-अडीज तास आधीच होतो. या गावात दिवस फक्त 6 ते 7 तासांचा असतो. ज्यामुळे भारतातील सर्वात लहान दिवस असलेलं गाव ठिकाण म्हणायला काहीही अपवाद नाही. निसर्गाच्या सानिध्यात दुर्मिळ सह्याद्री पर्वतांच्या च्या डोंगररांगात हे छोटंस गाव वसलं आहे. आपण देखील ह्या गावाला भेट देऊन प्रत्यक्षात स्वर्गाची अनुभूती भूमीवरच घेऊ शकतात. बयूरो रिपोर्ट भारत लाईव्ह न्यूज मीडिया !