‘आप’ भाजपसोबत असल्याने युती अशक्य : ठाकरे

प्रतिनिधी/ पणजी आम आदमी पक्षासोबत (आप) युती करण्याची शक्यता काँग्रेस पक्षाचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी फेटाळून लावली आहे. जो आप पक्ष काँग्रेसच्या विरोधात बोलतो, काँग्रेस नेत्यांवर टीका करतो, तो भाजपसोबत असल्याचे दिसून येते असे निवेदन त्यांनी पत्रकार परिषदेतून केले. दरम्यान जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने जय्यत तयारी केली असून त्याकरिता उच्चस्तरीय समितीची स्थापना केल्याची […]

‘आप’ भाजपसोबत असल्याने युती अशक्य : ठाकरे

प्रतिनिधी/ पणजी
आम आदमी पक्षासोबत (आप) युती करण्याची शक्यता काँग्रेस पक्षाचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी फेटाळून लावली आहे. जो आप पक्ष काँग्रेसच्या विरोधात बोलतो, काँग्रेस नेत्यांवर टीका करतो, तो भाजपसोबत असल्याचे दिसून येते असे निवेदन त्यांनी पत्रकार परिषदेतून केले. दरम्यान जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने जय्यत तयारी केली असून त्याकरिता उच्चस्तरीय समितीची स्थापना केल्याची माहिती त्यांनी दिली.
ते पुढे म्हणाले की त्या समितीत वरिष्ठ काँग्रेस नेत्यांचा समावेश करण्यात आला असून जिल्हा पंचायत निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी समितीवर सोपवण्यात आली आहे. समितीत गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर, खासदार विरियातो फर्नांडिस, आमदार कार्लोस फेरेरा, आमदार एल्टन डिकॉस्ता आणि एम. के. शेख यांचा समावेश आहे.  आता जि. पं. निवडणूक स्वतंत्रपणे लढायची की युती करून ते समिती ठरवणार आहे. इतर राज्यस्तरीय प्रादेशिक पक्षांशी चर्चा करण्यात येणार आहे आणि युतीबाबत विचारणा होणार असल्याचे ठाकरे यांनी नमूद केले. फोंडा विधानसभा पोटनिवडणुकी प्रकरणी पक्षश्रेष्ठी आणि गोव्यातील काँग्रेस नेते एकमेकांशी सल्ला मसलत करून योग्य तो निर्णय घेतला जाणार असल्याचे ते म्हणाले.