सुप्रियाने स्वतःसाठी केला निर्माण रोजगार, एका दिवसाचे ड्रोनद्वारे फवारणीतून मिळतात इतके रुपये : भारत लाईव्ह न्यूज मीडिया ! सुप्रियाने स्वतःसाठी केला निर्माण रोजगार, एका दिवसाचे ड्रोनद्वारे फवारणीतून मिळतात इतके रुपये : भारत लाईव्ह न्यूज मीडिया !

सुप्रियाने स्वतःसाठी केला निर्माण रोजगार, एका दिवसाचे ड्रोनद्वारे फवारणीतून मिळतात इतके रुपये : भारत लाईव्ह न्यूज मीडिया !

सुप्रिया नवले या अहमदनगर जिल्ह्यातील मालदाड गावात वास्तव्यास आहेत आणि सध्या त्या ड्रोन पायलट म्हणून कार्यरत आहेत. बीएस्सी अॅग्रीची पदवी मिळवल्यानंतर त्यांनी पुण्यात ड्रोन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेतले.

नोव्हेंबरमध्ये प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर, फेब्रुवारीमध्ये सुप्रिया यांना एका कंपनीकडून ड्रोन प्राप्त झाला. सोबतच त्यांना एक इलेक्ट्रिक वाहन, जनरेटर आणि बॅटरीसारखे साहित्यही देण्यात आले.

सुप्रिया यांच्या ताब्यात असलेला ड्रोन पिकांवर कीटनाशक, बुरशीनाशक आणि खतांच्या फवारणीसाठी वापरण्यात येतो.

सुप्रिया यांच्याकडे शेतकरी ड्रोनद्वारे फवारणीसाठी संपर्क साधतात. त्यानंतर त्या ड्रोन, बॅटरी आणि जनरेटर या वस्तू इलेक्ट्रिक वाहनात ठेवून शेतकऱ्यांच्या शेताकडे मार्गस्थ होतात.

सुप्रियाने स्वतःसाठी केला निर्माण रोजगार, एका दिवसाचे ड्रोनद्वारे फवारणीतून मिळतात इतके रुपये : भारत लाईव्ह न्यूज मीडिया !
सुप्रियाने स्वतःसाठी केला निर्माण रोजगार, एका दिवसाचे ड्रोनद्वारे फवारणीतून मिळतात इतके रुपये : भारत लाईव्ह न्यूज मीडिया !

सुप्रिया सांगतात, “शेतात गेल्यावर सर्वप्रथम मी माझ्या उपकरणांची सेट-अप करते. त्यानंतर शेतकऱ्याच्या शेताची तपासणी करून, तिथं कुठे अडथळा आहे का, बांधावर किंवा साईडला काही अडथळे आहेत का, ते सर्व पाहते. हे मला रिमोट कंट्रोलमध्ये दिसत असतं.”

“फवारणीसाठी ज्या क्षेत्रावर काम करायचं आहे, त्या क्षेत्राचं मॅपिंग करते. कॉर्नर पॉइंट निवडून, स्पेसिंग, डिस्टन्स, आणि अल्टिट्यूड यांचा योग्य मेळ साधते. यानंतर ऑटो मोडमध्ये 7 मिनिटात 1 एकर क्षेत्रावर फवारणी पूर्ण होते.”

ड्रोनद्वारे कीटनाशक किंवा खतांची फवारणी हे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी सध्या एक आकर्षक नवीन तंत्रज्ञान आहे. जेव्हा सुप्रिया एका शेतात ड्रोन फवारणीसाठी आल्या, तेव्हा आसपासचे शेतकरी कुतूहलाने एकत्र जमले होते.

या शेतकऱ्यांना ड्रोन तंत्रज्ञान कसे कार्य करते हे जाणून घेण्याची उत्सुकता होती.

शेतकरी भीमराज नवले पहिल्यांदाच त्यांच्या डांगर पिकावर ड्रोनद्वारे फवारणी करत होते, आणि ही फवारणी त्यांना विश्वासार्ह वाटत आहे.

भीमराव सांगतात, “पूर्वी बॅटरी पंप वापरून फवारणी करत होतो. एका पंपासाठी साधारण 10 ते 15 मिनिटे लागत असत. 10 पंपसाठी साधारण 2 तास लागायचे. आता मात्र 10 मिनिटांत 1 एकर क्षेत्रावर फवारणी होते.

“पावसाळ्यातही 10 मिनिटांत पूर्ण फवारणी होते, त्यामुळे औषध वाचतं आणि मजुरांचा प्रश्नही सुटतो.”

ड्रोन फवारणीतून रोजगार

ड्रोन म्हणजे मानविरहित चालणारं यंत्र. ड्रोनमध्ये नेव्हिगेशन सिस्टीम, जीपीएस, वेगवेगळे सेन्सर्स, कॅमेरे यांचा समावेश असतो. ड्रोनचे त्याच्या वजनानुसार वेगवेगळे प्रकार पडतात.

ड्रोनची किंमत साधारणपणे 6 लाखांपासून ते 15 लाखांपर्यंत असते. शेतीकामासाठी वापरले जाणारे ड्रोन साधारणपणे 3 मीटर उंचीपर्यंत वरती घेता येतात आणि त्याची रेंज 2 ते 4 किलोमीटरपर्यंत असते.

शेतकऱ्यांना भाडेतत्त्वावर ड्रोन उपलब्ध करुन दिल्यामुळे सुप्रिया यांना एकप्रकारचा रोजगार मिळाला आहे.

ड्रोन फवारणीतून रोजगार
ड्रोन फवारणीतून रोजगार

सुप्रिया सांगतात, “एक एकर क्षेत्र फवारणीसाठी मी 300 रुपये घेते. अजून तरी माझ्यासाठी सगळ्या गोष्टी नवीनच आहे. एक-दीड महिनाच झालाय. तरी दिवसाला 4 ते 5 हजार रुपये घरात घेऊन येते.”

ड्रोनसारख्या तंत्रज्ञानातून पिकांवर येणाऱ्या रोगाची सुरुवातीची लक्षणं ओळखून त्यावर वेळीच उपाय करता येईल. याद्वारे औषधाची बचत होऊन कमी मनुष्यबळात, कमी वेळेत शेतीची कामं करता येईल आणि परिणामी पिकांची उत्पादकता वाढण्यास मदत होईल, असं म्हटलं जात आहे.

असं असलं तरी ड्रोनच्या वापराला अजून तरी सार्वत्रिक स्वरूप आलेलं नाहीये.

Add a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *