बदलापूर घटनेनंतर शिक्षण मंत्रालयाचा निर्णय, प्रत्येक शाळेच्या वॉशरूम आणि क्लासरूममध्ये पॅनिक बटण बसवणार
बदलापुरात चिमुकलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाने महाराष्ट्र हादरलं आहे. या प्रकारानंतर शिक्षण मंत्रालयाने अहवाल तयार केला आहे. हा अहवाल शिक्षणमंत्री दीपक केसकरांना सादर केला आहे.
बदलापूर घटनेबाबत महिला व बालकल्याण आणि विकास मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालयाने अहवाल तयार केला आहे.तो गृहमंत्रालयाला सादर करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. यासोबतच यात सहभागी असलेल्यांवर कोणत्या कलमांखाली कारवाई करावी, असेही त्यांनी सांगितले. याचावर ही निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेतील स्वच्छतागृहे,वर्गखोल्या इत्यादींमध्ये पॅनिक बटणे बसवली जातील.पॅनिक बटणाचे नियंत्रण शाळा आणि स्थानिक पोलिस स्टेशनच्या देखरेखीखाली असेल. पॅनिक बटणावरून पोलिसांना अलर्ट मिळाल्यास पोलिस घटनास्थळी पोहोचतील.
बदलापूर येथील शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा सफाई कामगार हा गुन्हा करणारा मुख्य आरोपी आहे. या सफाई कामगारावर पॉक्सो कायद्यान्वये कारवाई करण्यात येत आहे. कल्याण न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
Edited by – Priya Dixit