छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यावर कारवाई, कंत्राटदारावर एफआयआर दाखल

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये राजकोट किल्यावर 2023च्या नौदल दिनानिमित्त उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यावर कारवाई, कंत्राटदारावर एफआयआर दाखल

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये राजकोट किल्यावर 2023च्या नौदल दिनानिमित्त उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं.छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘शौर्याला सलाम’ म्हणून 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनानिमित्त उभारण्यात आलेला पुतळा कोसळला आहे.

या प्रकरणी दोन जणांवर एफआयआर दाखल करण्यात आली आहे. तक्रारीत कंत्राटदार आणि कारागीर कम्पनीचे मालक जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टन्ट वर निष्काळजीपणा आणि कामाचा नित्कृष्ट दर्जा करण्याचा आरोप आहे. 

यांच्यावर न्यायिक संहितेच्या विविध कलमांतर्गत कलम 109, 110, 125आणि 318 (3) (5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुतळा कोसल्याबाबत सहाय्यक अभियंता आणि सार्वजनिक बांधकामाचे अधिकारी अजित पाटील यांनी सिंधुदुर्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

या दोघांच्या विरोधात एफआयआर दाखल केली आहे या मध्ये म्हटलं आहे की  पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी 20 ऑगस्ट रोजी कंत्राटदारांना मेल पाठवून नट आणि बोल्ट गंजल्याची माहिती दिली तसेच यामुळे पुतळ्याला धोका असल्याचे सांगितले असून देखील कोणतीही कारवाई केली नाही. 

हा पुतळा  2023च्या नौदल दिनानिमित्त उभारण्यात आला असून त्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र हा पुतळा वर्षाच्या आत कोसळला. या पुतळ्याला बसवण्यासाठी 3600 कोटी रुपयांचा खर्च आला होता.भारतीय नौदलाने पुतळ्याची दुरुस्ती आणि जीर्णोद्धारासाठी एक पथक पाठविले आहे.   

Edited by – Priya Dixit   

Go to Source